सदोष मनुष्यवध, तरुणाला सहा वर्ष कैद! १४ साक्षीदारांची तपासणी

By सुनील पाटील | Published: September 29, 2022 06:43 PM2022-09-29T18:43:28+5:302022-09-29T18:43:53+5:30

न्यायालय: दोन जण फितूर, आई निर्दोष

Defective manslaughter, young man imprisoned for six years! Examination of 14 witnesses | सदोष मनुष्यवध, तरुणाला सहा वर्ष कैद! १४ साक्षीदारांची तपासणी

सदोष मनुष्यवध, तरुणाला सहा वर्ष कैद! १४ साक्षीदारांची तपासणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: बहिणीला शेतात कामाला का नेतात असा जाब विचारुन छायाबाई किशोर महानुभाव (वय ३५, रा.खडके खुर्द, ता.एरंडोल) यांच्या डोक्यात काठी मारुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी समाधान तुकाराम धनगर (वय ३०, रा.खडके खुर्द, ता.एरंडोल) याला न्यायालयाने सहा वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. समाधानची आई सुबाबाई धनगर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

या घटनेबाबत माहिती अशी की, छायाबाई किशोर महानुभाव, पती किशोर शेनफडू महानुभाव, मुलगी पूजा व सरला उर्फ गुड्डी तुकाराम धनगर असे चौघे जण १५ मे २०१६ रोजी बैलगाडीने शेतात जात असताना सरलाचा भाऊ समाधान, आई सुबाबाई व वडिल तुकाराम त्र्यंबक धनगर असे या चौघांजवळ आले व सरलाला तुम्ही कामाला घेऊन जातात असा जाब विचारुन शिवीगाळ करुन समाधान याने हातातील काठीने छायाबाई हिच्या डोक्यावर मारले. सरलाला कामावर नेले तर तुम्हाला जीवंत ठेवणार नाही व तुम्हाला विहिरीत फेकुन देईल अशी धमकी दिली होती. छायाबाई यांनी उपचार घेत असताना पोलिसांना असा जबाब दिला होता त्यावरुन एरंडोल पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.  १८ मे रोजी छायाबाई यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले होते.

१४ साक्षीदारांची तपासणी

तपासाधिकारी एम.एस.बैसाणे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. मयताची मुलगी पुजा, डॉ.शेख आसिफ इकबाल, डॉ.प्राजक्ता भिरुड, डॉ.मुकेश चौधरी, मृत्यूपुर्व जबाब घेणारे सहायक फौजदार भालचंद्र पाटील आदींसह १४ जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. मयताचे पती व सरला हे दोघं जण फितूर झाले होते. सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने समाधान याला ३०४ (२) सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरुन सहा वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी तुकाराम धनगर खटला सुरु असताना त्याचा मृत्यू झाला तर सुबाबाई हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

Web Title: Defective manslaughter, young man imprisoned for six years! Examination of 14 witnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.