देहविक्री प्रकरणात गोव्यात दिल्लीच्या दलालाला अटक, युवतीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 20:42 IST2020-10-09T20:40:57+5:302020-10-09T20:42:36+5:30
Prostitution Racket : युवतीही दिल्ली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देहविक्री प्रकरणात गोव्यात दिल्लीच्या दलालाला अटक, युवतीची सुटका
मडगाव: गोव्यातील कोलवा पोलिसांनी गुरुवारी रात्री देहविक्रीचा पर्दाफाश करताना मूळ दिल्ली येथील एका दलालाला अटक करुन एका युवतीची सुटका केली. अभिषेक मेहरा (२१) असे संशयिताचे नाव आहे. येथील सेनाभार्टी येथे पोलिसांनी संशयिताला त्या युवतीसह ताब्यात घेतले व नंतर रितसर अटक केली. युवतीही दिल्ली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोबाईलवरुन ग्राहकांशी संपर्क साधून नंतर संशयित मुली पुरवित होता. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवली होती. वेश्याव्यवसाय प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.