6 लाखांचं बिल अन् खात्यात फक्त 41 रुपये; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिली अन् पैसे देताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:02 PM2024-01-31T14:02:41+5:302024-01-31T14:04:21+5:30

15 दिवस हॉटेलमध्ये राहिली आणि येथील अनेक सेवांचा लाभ देखील घेतला. याच दरम्यान महिलेने केवळ 2 लाख 11 हजार रुपयांची स्पा सर्व्हिस घेतली. 

delhi airport police arrested women for fraud with pullman delhi hotel not paying bills | 6 लाखांचं बिल अन् खात्यात फक्त 41 रुपये; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिली अन् पैसे देताना...

6 लाखांचं बिल अन् खात्यात फक्त 41 रुपये; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिली अन् पैसे देताना...

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एयरोसिटीमधील पुलमॅन हॉटेलने एका महिलेने 6 लाखांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, एका महिलेने 13 डिसेंबर रोजी एयरोसिटीच्या पुलमॅन हॉटेलमध्ये बनावट नावाने बुकिंग केलं होतं. त्यानंतर ती 15 दिवस हॉटेलमध्ये राहिली आणि येथील अनेक सेवांचा लाभ देखील घेतला. याच दरम्यान महिलेने केवळ 2 लाख 11 हजार रुपयांची स्पा सर्व्हिस घेतली. 

15 दिवस राहिल्यानंतर तिने 5 लाख 80 हजार रुपये यूपीआय पेमेंट केलं, मात्र महिलेने पैसे दिल्याचं सांगितल्यानंतर पैसे मिळाले नाहीत असं हॉटेल मालकांचं म्हणणं आहे. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी महिलेला तिचं बँक स्टेटमेंट दाखवण्यास सांगितलं असता महिलेने स्पष्ट नकार देत तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिला पळताना पाहून हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी तिला पकडून याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तपासात महिलेच्या अकाऊंटमध्ये फक्त 41 रुपये असल्याचं उघड झालं.

IGI एयरपोर्ट पोलिसांनी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता परंतु नंतर पोलिसांनी तिच्यावर कलम 419 (तोतयागिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा), 468 आणि 471 (खोटी कागदपत्रं खरी म्हणून वापरणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी महिला पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

हॉटेलमध्ये फसवणूक करणाऱ्या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती व्यवसायाने डॉक्टर असून तिचा नवराही डॉक्टर आहे. जो न्यूयॉर्कमध्ये राहतो. मात्र, ती महिला तिच्या व्यवसायाबाबत खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलेने खोट्या नावाने हॉटेल बुक केलं होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: delhi airport police arrested women for fraud with pullman delhi hotel not paying bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.