गोव्यात दिल्लीतील पर्यटकाला चोरटयाचा हिसका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 15:54 IST2020-01-20T15:53:09+5:302020-01-20T15:54:42+5:30
दहा लाखाचा ऐवज पळविला

गोव्यात दिल्लीतील पर्यटकाला चोरटयाचा हिसका
मडगाव - गोव्यात सहलीसाठी आलेल्या दिल्ली येथील एका पर्यटकाला अज्ञात चोरटयाने हिसंका दाखविताना दहा लाखाचा ऐवज पळविला. काल रविवारी ही घटना घडली. सुधीर कुमार सेहगल (६३) असे या पर्यटकाचे नाव असून, केळशी येथील एका हॉटेलात त्याचे वास्तव होते. या हॉटेलातील त्याच्या खोलीतून हा ऐवज पळविण्यात आला आहे.
दीड लाख रोख तसेच सोन्याच्या बांगडया व सोनसाखळी मिळून दहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार सेहगल यांनी कोलवा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. भारतीय दंड संहितेंच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहूल नाईक पुढील तपास करीत आहेत.