अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस तत्काळ आरोपीपर्यंत पोहोचले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:05 PM2023-01-31T13:05:35+5:302023-01-31T13:06:54+5:30

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना सोमवारी रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

Delhi Cm Arvind Kejriwal Receives Death Threat | अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस तत्काळ आरोपीपर्यंत पोहोचले, पण...

अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस तत्काळ आरोपीपर्यंत पोहोचले, पण...

Next

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री  (Delhi Chief Minister) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले. पण, त्याला अटक केली नसून त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांना धमकी देणारी व्यक्ती मानसिक आजारी असून त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचारही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांना सोमवारी रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवरून धमकी देणारा 38 वर्षीय व्यक्ती हा मानसिक आजारी असून त्याच्यावर दिल्लीतील गुलाबी बाग येथे उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्याला अटक केली नाही. रात्री उशिरा पोलिसांना पीसीआरवर कॉल आला होता, ज्यामध्ये त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 12 वाजता आरोपींनी पोलिसांना फोन करून अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यानंतर आरोपी हा मुंडका येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांचे सांगितले. मात्र, पोलिसांचे पथक त्याची चौकशी करत आहे.

मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा धमकी
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2019 मध्येही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयातील एका निनावी मेल आयडीवरून दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या मेलनंतर दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.

Web Title: Delhi Cm Arvind Kejriwal Receives Death Threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.