रात्री पती बघत होता अश्लील सिनेमा, पत्नीने बघण्यास नकार दिला तर पतीने केलं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:58 PM2022-03-28T12:58:59+5:302022-03-28T12:59:10+5:30
Delhi Crime News: मोबाइलवर अश्लील सिनेमा बघत असलेल्या पतीने पत्नीलाही ते बघण्यास सांगितलं. पण त्यास नकार दिला. तर पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर चाकूने हल्ला करत फरार झाला.
Delhi Crime News: राजधानी दिल्लीमध्ये एका माथेफिरू पतीने पत्नीवर चाकूने वार केला, तेही केवळ या कारणाने की, त्याच्या पत्नी त्याच्यासोबत अश्लील सिनेमा पाहण्यास नकार दिला. दिल्लीच्या अलीपूरमध्ये झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारहीच आहे. मोबाइलवर अश्लील सिनेमा बघत असलेल्या पतीने पत्नीलाही ते बघण्यास सांगितलं. पण त्यास नकार दिला. तर पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर चाकूने हल्ला करत फरार झाला.
यानंतर महिला जोरात ओरडली. मग कुटुंबिय धावत आले आमि महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याबाबत पोलिसातही तक्रार देण्यात आली असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत. महिलेचं वय साधरण ४९ आहे तर त्यांचं लग्न १९९३ मध्ये झालं होतं.
अमर उजालाच्या वृत्तानुसार, आरोपीने केवळ पत्नीलाच मारहाण करतो असं नाही तर मुलांनाही मारहाण करतो. महिलेचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासूनच पती तिला त्रास देत होता. घटनेच्या दिवशी काय घडलं हे सांगताना महिला म्हणाली की, शनिवारी रात्री ११ वाजता पती घरात अश्लील सिनेमा बघत होता आणि तिला सिनेमा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा पतीने तिला मारहाण केली. महिला ओरडली तेव्हा तो चाकूने हल्ला करून फरार झाला.
यानंतर महिलेचा दीर लगेच रूममध्ये पोहोचला. ती त्याला जखमी दिसली आणि आरोपी पती फरार झाला होता. यानंतर महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधूनच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली.