धक्कादायक! 12 वर्षीय मुलावर सामूहिक अत्याचार, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत रस्त्यावर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 07:38 PM2022-09-25T19:38:47+5:302022-09-25T19:43:54+5:30
राजधानी दिल्लीत एका 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली:दिल्लीत निर्भयाप्रमाणे धक्कादायक घटना घडली आली आहे. यावेळेस पीडित मुलगी नसून, एक 12 वर्षीय मुलगा आहे. एका 12 वर्षाच्या मुलावर 4 नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केला, नंतर लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. पोलिसांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, तिघे फरार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 सप्टेंबरची ही घटना सीलमपूर भागातील आहे. 22 सप्टेंबर रोजी मुलाच्या पालकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी रविवारी याबाबत खुलासा केला आहे.
दिल्ली में लड़की तो क्या लड़के भी सुरक्षित नहीं हैं। एक 12 साल के लड़के के साथ 4 लोगों ने बुरी तरह से रेप किया और डंडों से पीटकर अधमरी हालत में छोड़कर चले गए। हमारी टीम ने मामले में FIR दर्ज करवाई। 1 आरोपी गिरफ़्तार, 3 अब भी फ़रार, दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। pic.twitter.com/tXrqK7xkwm
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 25, 2022
महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस
दिल्ली महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या- दिल्लीत मुलींसोबत मुलेही सुरक्षित नाहीत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून मुलाला न्याय मिळावा, असे त्या म्हणाल्या. स्वाती मालीवाल यांनी या घटनेबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून 28 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे.
12 साल के लड़के से बलात्कार के मामले में दिल्ली पुलिस को नोटिस जारी किया है. सभी आरोपी जल्द से जल्द गिरफ्तार हों और बच्चे को न्याय मिले. pic.twitter.com/352eWsL1pD
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 25, 2022
पोलिसांचा तपास सुरू
ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. लवकरात लवकर इतर तिघांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींचा पीडित मुलाशी काय संबंध होता, हेदेखील पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.