एकतर्फी प्रेमात तरूण पिस्तुल घेऊन तरूणीच्या घरी गेला, म्हणाला - लग्न कर नाही तर...आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:52 PM2021-10-28T13:52:27+5:302021-10-28T14:13:02+5:30

पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी राहुलला पीडित महिलेसोबत मैत्री करायची होती. पण महिलेने त्याला नेहमीच नकार दिला. एकदा नाही तर अनेकदा त्याचे प्रस्ताव तिने नाकारले.

Delhi Crime News : Police arrested accused who threaten woman to kill karva chauth | एकतर्फी प्रेमात तरूण पिस्तुल घेऊन तरूणीच्या घरी गेला, म्हणाला - लग्न कर नाही तर...आणि मग...

एकतर्फी प्रेमात तरूण पिस्तुल घेऊन तरूणीच्या घरी गेला, म्हणाला - लग्न कर नाही तर...आणि मग...

googlenewsNext

दिल्लीतील एक माथेफिरू रोम रोमिओ पिस्तुल घेऊन प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि तिला धमकावल्याची घटना समोर आली आहे. सूचनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचेल आणि त्यांनी माथेफिरू तरूणाला धडा शिकवला. पोलिसांनुसार, आरोपी तरूण बऱ्याच दिवसांपासून तरूणीला त्रास देत होता. सोबतच तिला मारण्याची धमकीही देत होता. जेणेकरून तरूणीने त्याच्यासोबत लग्न करावं. इतकंच नाही तर सुरूवातीपासूनच तरूणी आरोपीच्या वागण्यामुळे त्रासली होती. पण आरोपी तिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरून बसला होता.

पोलिसांनी राहुल नावाच्या एका तरूणाला अटक केली. अटकेनंतर त्याच्याकडून एक पिस्तुलही ताब्यात घेतलं. पोलिसांनुसार, एका महिलेला धमकी देण्यासंबंधी एक पीसीआर कॉल आला होता. कॉलला लगेच रिप्लाय देत पोलिसांची टीम  घटनास्थळी पोहोचली होती. तेव्हा त्यांना दिसलं की, एक तरूण पिस्तुल घेऊन उभा आहे. त्यांनी त्याला लगेच पकडलं. 

पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी राहुलला पीडित महिलेसोबत मैत्री करायची होती. पण महिलेने त्याला नेहमीच नकार दिला. एकदा नाही तर अनेकदा त्याचे प्रस्ताव तिने नाकारले.

इतकंच नाही तर करवा चौथला आरोपीची इच्छा होती की, महिलेने त्याच्यासाठी व्रत करावा आणि त्याच्या घरी तिने यावं. त्याने तिला धमकी दिली  की, तो तिचा जीव घेईल आणि स्वत:सोबतही तसंच करेल.

दिल्ली पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपीचं नाव राहुल आहे आणि तो बदरपूरचा राहणारा आहे. तेच आरोपी तरूण तरूणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे तो तिला नेहमीच त्रास देत होता. यादरम्यान तो तिच्या घरी केवळ पिस्तुल घेऊनच गेला नाही तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
 

Web Title: Delhi Crime News : Police arrested accused who threaten woman to kill karva chauth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.