पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:01 AM2021-05-14T10:01:37+5:302021-05-14T10:06:35+5:30

Delhi Crime News : घटनास्थळी पोलीस पोहोचले तर त्यांना दिसलं की, सीमाचा मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये अर्धा बाहेर तर अर्धा आत होता. तिचा मृतदेह अर्धनग्न होता.

Delhi crime news suicide or murder case registered police probe | पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब!

पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब!

Next

राजधानी दिल्लीत ३० वर्षीय सीमाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना संशयास्पद यासाठी आहे कारण सीमा अर्धनग्न मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये सापडला. घटनास्थळी पोलीस पोहोचले तर तेही हैराण झाले. त्यांनाही प्रश्न पडला की, कुणी पाण्याच्या ड्रममध्ये आत्महत्या कशी करेल. तेही अर्धनग्न होऊन. हा प्रश्न पोलिसांनाही हैराण करत आहे. ही उत्तर पूर्व दिल्लीतील आहे. सीमाचं लग्न शैलेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत २०१० मध्ये  झालं होतं. शैलेंद्र आणि सीमाला तीन अपत्ये आहे. शैलेंद्र हा परिवारासोबत त्रिनगर भागात आपल्या परिवारासोबत राहतो. ११ मेच्या दुपारी साधारण १२.३० वाजता सीमाच्या परिवाराने पोलिसांना माहिती दिली की, सीमाचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस पोहोचले तर त्यांना दिसलं की, सीमाचा मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये अर्धा बाहेर तर अर्धा आत होता. तिचा मृतदेह अर्धनग्न होता. सासरच्या लोकांनी आपली बाजू सांगितली की, सीमाने आत्महत्या केली. पण प्रश्न हा उभा राहिला की, आत्महत्या करण्याची ही कोणती पद्धत आहे. प्रश्न असाही होता की, कुणी ड्रममध्ये आत्महत्या कसा करेल. याच गोष्टीने सीमाच्या माहेरच्या लोकांना आणि पोलिसांना हैराण केलंय.

बहिणीच्या मृत्यूची बातमी मिळताच भाऊ घटनास्थळी पोहोचला तेव्हा मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला होता. पोलिसांनी सीमाचा भाऊ प्रदीपला सांगितले की, त्याच्या बहिणीने आत्महत्या केली आणि एक सुसाइड नोटही पोलिसांना मिळाली. प्रदीप पोलिसांना हे सतत सांगत होता की, त्याची बहीण आत्महत्या करू शकत नाही. त्याच्या बहिणीने अनेकदा फोन करून सांगितलं होतं की, तिला सासरी त्रास दिला जातो. कधी कधी मारहाण केली जाते. (हे पण वाचा : फेसबुकवर मैत्री, कुटुंबाच्या भेटीच्या बहाण्यानं तरुणीला बोलावलं; जंगलात २५ जणांनी केला बलात्कार)

प्रदीप कुमारने सांगितलं की, 'माझी बहीण सीमासोबत १० मे रोजी मारहाण झाली. या सर्व गोष्टी माझ्या बहिणीने रडून रडून हे सगळं सांगितलं होतं. माझ्या बहिणीने याआधीही अनेकदा मला हे सांगितलं होतं. तिचा पती शैलेंद्र याचं एका तरूणीसोबत अफेअर होतं. ज्याबाबत तिने मला सांगितलं होतं. शैलेंद्र त्याचे सर्व पैसे त्या मुलीवर खर्च करत होता. शैलेंद्र, सीमाला पुन्हा पुन्हा हे म्हणत होता की, तू आत्महत्या कर. प्रदीपने सांगितलं की, शैलेंद्रची बहीण कुसुम, भाची सोना आणि भाचा आर्य़न यांनीही तिला मारहाण केली होती. ज्यामुळे माझी बहीण परेशान होती. (हे पण वाचा : कोयत्याने डोक्यात वार करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा जणांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा)

पोलिसांनी सांगितलं की, सीमाच्या बेडखाली एक सुसाइड नोट सापडली आहे. सीमाच्या परिवाराने शंका व्यक्ती केली की, हे तिचं अक्षर नाही. तिची आधी हत्या करण्यात आली आणि नंतर तिचा मृतदेह ड्रममध्ये टाकण्यात आला. पोलिसांना नंतर आत्महत्येसाठी भाग पाडण्याच्या प्रकरणात शैलेंद्रला अटक केली.

सीमाचा भाऊ प्रदीप कुमारने पोलिसांना तिच्या मृत्यूआधीची एक ऑडिओ टेपही दिली आहे. ज्यात सीमा रडून रडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगत आहे. यानंतरही पोलिसांनी केवळ एकाच व्यक्तीला अटक केली. सीमाच्या घरच्यांनी सांगितलं की, सीमाची नणंद, कुसुम, कविता, इंद्रकला नंदचा मुलगा आर्यन आणि सासू प्रभुतीने सीमाला मारहाण केली. हे सगळे तिच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. त्यांनी सीमाची हत्या केली.
 

Web Title: Delhi crime news suicide or murder case registered police probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.