दिल्लीत अजून एक 'कंझावला कांड', टॅक्सी चालकाला 200 मीटर फरफटत नेले; जागीच मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:12 PM2023-10-11T15:12:14+5:302023-10-11T15:12:56+5:30

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 'कंझावाला'सारखी घटना घडली आहे.

delhi-crime-viral-video-car-drag-body-of-cab-deiver-police-confirmed-death-on-the-spot | दिल्लीत अजून एक 'कंझावला कांड', टॅक्सी चालकाला 200 मीटर फरफटत नेले; जागीच मृत्यू...

दिल्लीत अजून एक 'कंझावला कांड', टॅक्सी चालकाला 200 मीटर फरफटत नेले; जागीच मृत्यू...

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 'कंझावाला'सारखी घटना घडली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कार चालकाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या वेदनादायक आणि हृदयद्रावक घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या कारस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर पोलिसांनी तपास केला असता, हा व्हिडीओ NH8 च्या सर्व्हिस रोडचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला, त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील वसंत कुंज उत्तर पोलीस स्टेशन परिसरातील महिपालपूरजवळील NH 8 सर्व्हिस लाइनवर त्या व्यक्तीला सुमारे 200 मीटरपर्यंत ओढत नेले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना काल रात्री 11.30 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांना NH 8 सेवा मार्गावर एक मृतदेह पडलेला आढळला. बिजेंद्र असे मृताचे नाव असून तो फरिदाबादचा रहिवासी आहे. बिजेंद्र व्यवसायाने टॅक्सी चालक होता. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी बिजेंद्रची कार लुटण्याचा प्रयत्न केला, त्याला विरोध केला असताना, बिजेंद्रला मारहाण करत ओढत नेले. पोलीस या प्रकरणाचा विविद अँगलने तपास करत आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

काय आहे कंझावाला घटना?
गेल्या वर्षी 31 डिसेंबरच्या रात्री एका तरुणीचा अशाच प्रकारचे मृत्यू झाला होता. एकार कारने त्या तरुणीला धडक मारली अन् नंतर तब्बल 12 किलोमीटर रस्त्यावर फरफटत नेले. या घटनेत मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला, तिच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना तेव्हाच अटक केली.

 

Web Title: delhi-crime-viral-video-car-drag-body-of-cab-deiver-police-confirmed-death-on-the-spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.