दारू लई वाईट! दारुपाई ATM फोडायला निघाला अन् असा पकडला गेला चोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:31 PM2022-02-01T18:31:50+5:302022-02-01T18:32:19+5:30
दक्षिण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एका चोरट्याला अटक केली आहे की ज्याचा एटीएम फोडण्याच्या इरादा होता. चोरट्याला एटीएम काही फोडता आलं नाही.
नोएडा
दक्षिण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एका चोरट्याला अटक केली आहे की ज्याचा एटीएम फोडण्याच्या इरादा होता. चोरट्याला एटीएम काही फोडता आलं नाही. स्पेशल पथकाच्या टीमनं त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव स्वप्न राय असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी विरोधात हौज थास ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
दक्षिण दिल्ली डीसीपी बेनिता मेरी जेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ आणि २६ जानेवारी दरम्यान मध्यरात्री पंचशील कॉम्प्लेक्स येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधी चोरानं तेथून पळ काढला होता. याप्रकरणात गुन्ह्याची नोंद करुन चौकशीला सुरुवात करण्यात आली होती.
गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता एसीपी राजेश कुमार यांनी विशेष पथकाचे इन्स्पेक्टर अतुल त्यागी, हौज खास एसएचओ शिवानी सिंह यांच्या नेतृत्त्वात तपासाला सुरुवात केली गेली. घटनास्थळावर तपास केल्यानंतर जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.
सीसीटीव्ही फुजेटचं विश्लेषण करण्यात आल्यानंतर एक व्यक्ती एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यात यश न आल्यानं तो पळून जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. संशयिताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीचं नाव स्वप्न राय असल्याचं समोर आलं आहे.
पोलीसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला. आरोपी एका ब्युटीकमध्ये काम करत होता. पण त्याला दारुचं व्यसन होतं. याच व्यसनापायी त्यानं पत्नीचे दागिने देखील विकले होते. दारु पिण्यासाठी पैसे मिळत नव्हते म्हणून या पठ्ठ्यानं थेट एटीएम फोडण्याच धाडस केलं होतं.