3 लाखांची किडनी 30 लाखांमध्ये विकत होते, ऑपरेशन थिएटरही केलं होतं तयार...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:25 PM2022-06-08T12:25:34+5:302022-06-08T12:26:35+5:30
Delhi Crime News : पोलिसांनी सांगितलं की, यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 10 लोकांना अटक केली आहे.
Delhi Crime News : दिल्ली पोलिसांनी एनसीआरच्या एका मोठ्या किडनी रॅकेटच्या खुलाशानंतर बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. या रॅकेटच्या टार्गेटवर 20 ते 30 तरूण राहत होते. जे पैशांसाठी आपली किडनी विकण्यासाठी तयार राहत होते. पोलिसांनी सांगितलं की, यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 10 लोकांना अटक केली आहे.
26 मे रोजी हौज खास पोलीस स्टेशन परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटची सूचना मिळाली होती. पोलीस उपायुक्त बेनिता मॅरी जॅकरने सांगितलं की, कुलदीप रे विश्वकर्मा टोळीचा मुख्य होता आणि सोनीपतच्या गुहानामध्ये डॉ. सोनू रोहिल्लाच्या क्लीनिकमध्ये बेकायदेशीर किडनी रॅकेट चालवत होता.
मॅरी रॅकरनुसार, कुलदीप विश्वकर्माने सर्वांना त्यांच्या भूमिकांनुसार पैसे दिले होते आणि क्लीनिकमध्ये गेल्या सहा-सात वर्षात 12 ते 14 किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. तो टोळीतील काही सदस्यांसोबत दिल्लीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होता.
पोलिसांनुसार, टार्गेट शोधण्याचं काम शैलेश पटेल, सर्वजीत जेलवाल यांना दिलं होतं. तर मोहम्मद लतीफला मेडिकल टेस्टचं काम दिलं होतं. विकास राहण्याची आणि ट्रॅवलिंगची जबाबदारी घेत होता. रंजीत पीडितांना हॉस्पिटलला नेण्याआधी त्यांची देखरेख करत होता.
पोलिसांनी सांगितलं की, रोहिल्लाशिवाय डॉ. सौरभ मित्तलही या बेकायदेशीर किडनी ट्रान्सप्लांटमध्ये सहभागी होता. पोलिसांनुसार, विश्वकर्माचे दोन सहकारी ओम प्रकाश शर्मा आणि मनोज तिवारी यांना अटक केली आहे. असं सांगितलं जात आहे की, टोळीकडून 3 लाख रूपयांमध्ये किडनी खरेदी केली जात होती आणि ती 30 लाख रूपयांमध्ये विकली जात होती.