बोंबला! इमोशनल ब्लॅकमेल करून तरूणींना लावत होता चूना, अशी झाली पोलखोल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 12:22 PM2021-03-13T12:22:03+5:302021-03-13T12:22:12+5:30

मोहितने इमोशनल कहाणी सांगत गरिमाकडून पैसे घेतले होते. काही पैसे गरिमाने मोहितला ऑनलाइन ट्रान्सवर केले होते.

Delhi innocent girls friendship emotional blackmailing conspiracy cheating disclosure arrest police crime | बोंबला! इमोशनल ब्लॅकमेल करून तरूणींना लावत होता चूना, अशी झाली पोलखोल.....

बोंबला! इमोशनल ब्लॅकमेल करून तरूणींना लावत होता चूना, अशी झाली पोलखोल.....

Next

दिल्ली पोलिसांनी मोहित गोयल नावाच्या एका अशा गुन्हेगाला अटक केली जो आधी मुलींसोबत मैत्री करायचा आणि नंतर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. तो आपल्या नातेवाईकांची आणि त्यांच्या मुलांच्या आजाराची खोटी कहाणी सांगत असे. या माध्यमातून ते मुलींकडून पैसे घ्यायचा आणि नंतर आपला मोबाइल नंबर बदलून दुसऱ्या शिकारीच्या शोधात राहत होता.

द्वारका डीसीपी संतोष कुमार मीणा यांच्यानुसार,  गरिमा शुक्ला नावाच्या एका मुलीने पोलिसात तक्रार दिली होती की, मोहित गोयल नावाची एक व्यक्ती साधारण १ वर्षाआधी बॅंक लोन मिळवून देण्याचं सांगत भेटला होता. भेटीदरम्यान दोघांची मैत्री झाली. काही दिवसांनी मोहित आपल्या एका मित्रासोबत पीडित मुलीला एका रेस्टॉरन्टमध्ये भेटला. रेस्टॉरन्टमध्ये मोहितने तरूणीला सांगितले की, त्याच्या पुतणीला कॅन्सर आहे आणि तिच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत. (हे पण वाचा : लुटेरी दुल्हन! बाळाला जन्म दिल्यावर सासरला लुटून फरार व्हायची, जास्त वयाच्या पुरूषांना बनवत होती शिकार....)

मोहितने हीच इमोशनल कहाणी सांगत गरिमाकडून पैसे घेतले होते. काही पैसे गरिमाने मोहितला ऑनलाइन ट्रान्सवर केले होते. यानंतर मोहितने गरिमाच्या नावाने दोन मोबाइल फोनही ऑनलाइन ऑर्डर केले होते. दोन्ही मोबाइल विकून त्याने पैसे मिळवले होते. पीडित तरूणीने जेव्हा त्याच्याकडे पैसे मागितले तर ट्रान्सफरचा एक खोटा स्क्रीनशॉट त्याने गरिमाला पाठवला आणि त्यानंतर आपला मोबाइल बंद करून फरार झाला. (हे पण वाचा : शॉकिंग ! अनुकंपा नाेकरीसाठी शरीरसुखाची मागणी)

पोलिसांनी गरिमाच्या तक्रारीवर एफआयआर नोंदवला आणि चौकशी सुरू केली. तपासातून समोर आले की, आरोपी मोहित सतत आपला मोबाइल  नंबर बदलत होता. यानंतर पोलिसांना एका गुप्त सूचनेच्या आधारावर मोहितला ट्रॅक केलं. आणि त्याला दिल्लीच्या डाबरी भागातून ताब्यात घेतलं.

दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की, मोहित गोयलने इमोशनल ब्लॅकमेल करून अनेक तरूणींना चूना लावला आहे. आता पोलीस यावर अधिक तपास करत आहे. सोबतच पोलिसांची एक टीम पीडितांशी संपर्क करत आहे. जेणेकरून मोहित विरोधात आणखी पुरावे मिळतील.
 

Web Title: Delhi innocent girls friendship emotional blackmailing conspiracy cheating disclosure arrest police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.