नोएडात दिल्लीसारखी घटना; डिलिव्हरी बॉयला कारने 500 मीटर फरफटत नेले, जागीच मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:56 PM2023-01-04T20:56:41+5:302023-01-04T20:59:00+5:30

राजधानी दिल्लीतील कंझावाला घटनेनंतर नोएडामध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे.

Delhi-like accident in Noida; Delivery boy dragged by car for 500 meters, dies on the spot | नोएडात दिल्लीसारखी घटना; डिलिव्हरी बॉयला कारने 500 मीटर फरफटत नेले, जागीच मृत्यू...

नोएडात दिल्लीसारखी घटना; डिलिव्हरी बॉयला कारने 500 मीटर फरफटत नेले, जागीच मृत्यू...

Next


नोएडा: राजधानी दिल्लीतील कंझावाला घटनेनंतर नोएडामध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. नोएडामध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एका डिलिव्हरी बॉयला कारने चिरडल्याची आणि फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सेक्टर 14 ए मध्ये घडली. या घटनेत स्विगीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. फ्लायओव्हरजवळ झालेल्या अपघातानंतर कार चालकाने तरुणाला 500 मीटरपर्यंत रस्त्यावर ओढले. यानंतर कारस्वार मृतदेह तिथेच टाकून फरार झाला.

इटावा येथील कौशल यादव असे मृताचे नाव असून तो स्विगीमध्ये काम करतो. तो दिल्ली-नोएडा येथील स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. 1 जानेवारी रोजी डिलिव्हरीसाठी जात असलेल्या कौशलचा अपघातातमृत्यू झाला. मृत कौशलचा भाऊ अमित कुमार याने याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. अमित कुमारने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 1 जानेवारी रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्याने त्याच्या भावाला फोन केला, पण त्याचा फोन अज्ञात व्यक्तीने उचलला.

उड्डाणपुल ते शनि मंदिरात मृतदेह चिरडला
त्या व्यक्तीने सांगितले रस्त्यावर फोन आढळला आहे, एका अज्ञात वाहनाने त्याच्या भावाला धडक दिली आहे. त्याने सांगितले की सेक्टर 14 फ्लायओव्हरजवळ गाडीने त्याला धडक दिली आणि त्याला शनि मंदिर रस्त्यापर्यंत ओढले. अमितने सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच तो ताबडतोब शनी मंदिरात पोहोचला, तिथे कौशलचा मृतदेह पडला होता. पोलीसही घटनास्थळी हजर होते. याप्रकरणी कौशलचा भाऊ अमित याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

धुक्यामुळे सीसीटीव्ही स्पष्ट नाही
2 जानेवारी रोजी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे, पण दाट धुक्यामुळे काहीही स्पष्टपणे दिसत नाहीय. पोलिसांनी हे फुटेज सोबत घेतले असून, पोलिसांनी अपघात करणाऱ्या कारस्वाराचा शोध सुरू केला आहे. पोलीस दिल्ली-नोएडाच्या रस्त्यांवर लावलेले सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी डिलिव्हरी बॉयचा अपघात झाला, तिथून हाकेच्या अंतरावर दिल्ली बॉर्डर आहे.

Web Title: Delhi-like accident in Noida; Delivery boy dragged by car for 500 meters, dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.