लिव इन पार्टनरची हत्या केल्यावर रूम लॉक करून पळाला प्रियकर आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:54 AM2022-11-18T11:54:24+5:302022-11-18T11:54:37+5:30
पोलिसांकडून 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख स्थानिक राहुलच्या रूपात झाली आहे.
दिल्लीमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदनपूर खादर भागात एका व्यक्तीने भांडण झाल्यावर प्रेयसीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर रूम लॉक करून पळून गेला. पोलिसांकडून 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख स्थानिक राहुलच्या रूपात झाली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, गेल्या शुक्रवारी दुपारी 2.50 वाजता एक फोन आला होता. ज्यात सांगण्यात आलं की, एक महिला एका रूममध्ये बेशुद्ध स्थितीत पडली आहे. तिला रूममध्ये कोंडण्यात आलं आहे. 22 वर्षीय महिलेचं नाव गुलशाना आहे. ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीसोबत राहत होती.
शवविच्छेदनातून समोर आलं आहे की, तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. ज्या रूममध्ये गुलशानाचा मृतदेह आढळून आला. त्या घरमालकाने सांगितलं की, राहुल नावाची व्यक्ती गेल्या 20-22 दिवसांपासून इथे राहत होता.
घरमालकाने सांगितलं की, त्याला शुक्रवारी राहुलचा फोन आला होता. तो म्हणाला होता की, त्याच्या प्रेयसीला मिरगीचा आजार आहे. ती त्याच्या रूममध्ये बेशुद्ध पडली होती. तो त्यावेळी तिथे नव्हता. पोलिसांनी सांगितलं की, राहुलचा मोबाइल सर्विलांसवर टाकून त्याला आली जंगलातून अटक करण्यात आली. तो एका खाजगी कंपनी काम करत होता.
राहुलने पोलिसांनी सांगितलं की, गुलशाना तिच्या मुलीसोबत कधी कधी त्याच्या रूमवर येत होती. राहुल असंही म्हणाला की, त्याला या महिलेसोबत लग्न करायचं होतं. पण त्याला संशय होता की, महिलेचं एका आदि नावाच्या तरूणासोबत अफेअर सुरू आहे. गेल्या गुरूवारी राहुल आणि गुलशाना यांच्यात भांडण झालं होतं. ज्यानंतर त्याने कथितपणे गुलशानाचा त्याने गळा आवळून हत्या केली. तसेच तिच्या मुलीला सोबत घेऊन पळाला.
पोलिसांनी सांगितलं की, गुलशानाच्या मुलीला सुखरूप गुलशानाच्या आईकडे सोपवण्यात आलं आहे.