बल्बवरुन भांडण; सासऱ्यानं सुनेचा गळा चिरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:53 AM2019-06-26T10:53:38+5:302019-06-26T10:54:05+5:30

वाढत्या वीज बिलावरुन झालेला वाद विकोपाला

Delhi Man Slits Daughter in laws Throat After Fight Over electricity bill | बल्बवरुन भांडण; सासऱ्यानं सुनेचा गळा चिरला अन्...

बल्बवरुन भांडण; सासऱ्यानं सुनेचा गळा चिरला अन्...

Next

दिल्ली: सासऱ्यानं सूनेची हत्या केल्याची घटना दिल्लीच्या पहारगंज भागात घडली. वाढलेलं वीज बिल आणि लाईट बल्बवरुन सून आणि सासू-सासऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. याच वादातून सासऱ्यानं सुऱ्यानं सुनेचा गळा चिरला. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना हत्येची माहिती दिली. 

नीरज देवी असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. सोमवारी रात्री नीरज देवी यांनी स्वयंपाक घरातील बल्ब काढला. त्यावरुन त्यांचा सासू, सासऱ्यांशी वाद झाला. यानंतर सासरे भगत राम यांनी सुऱ्यानं नीरज देवी यांचा गळा चिरला. नीरज देवी सतत माझ्याशी आणि माझ्या पत्नीसोबत वाद घालायची, अशी माहिती राम यांनी पोलिसांना दिली. याशिवाय नीरज देवीची पतीशीदेखील वारंवार भांडणं व्हायची, असं रामनं पोलिसांना सांगितलं. 

सूनेची हत्या केल्यानंतर 65 वर्षांच्या भगत राम यांनी रक्तानं माखलेल्या कपड्यांमध्येच पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. नीरज देवी सतत घरातील वीज बिलावरुन वाद घालायची. गेल्या महिन्यात जास्त बिल आल्यानं तिनं घरातील अनेक बल्ब काढले होते, असं राम यांनी पोलिसांनी सांगितलं. तर नीरज देवीच्या कुटुंबीयांनी मुलीचा सासरी छळ होत असल्याचा आरोप केला आहे. 
 

Web Title: Delhi Man Slits Daughter in laws Throat After Fight Over electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून