चोरी केलेल्या फोनवरून कॅब केली बुक; नंतर एकाच रात्री २ चालकांच्या केल्या हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 04:49 PM2022-01-09T16:49:15+5:302022-01-09T16:50:11+5:30

Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीच्या फोनवरून कॅब बुक केली होती. त्यानंतर लुटण्याच्या उद्देशाने दोन्ही कॅबच्या चालकांची हत्या करण्यात आली. पोलीस सध्या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहेत.

Delhi murder of two cab drivers in one night 2 accused arrested | चोरी केलेल्या फोनवरून कॅब केली बुक; नंतर एकाच रात्री २ चालकांच्या केल्या हत्या

चोरी केलेल्या फोनवरून कॅब केली बुक; नंतर एकाच रात्री २ चालकांच्या केल्या हत्या

Next

दिल्लीत शुक्रवारी रात्री 2 कॅब चालकांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीच्या फोनवरून कॅब बुक केली होती. त्यानंतर लुटण्याच्या उद्देशाने दोन्ही कॅबच्या चालकांची हत्या करण्यात आली. पोलीस सध्या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहेत.

मध्य जिल्हा पोलिसांनी माहिती दिली की, छाविनाथ हा ओला-उबेर कॅब चालवत असे. गुरुवारी रात्री 12.30 वाजल्यानंतर अनोळखी व्यक्तीने आनंद पर्वत परिसरातून आपली कॅब बुक केली, मात्र दुपारी 1 वाजल्यापासून कुटुंबीयांना छाविनाथचा कोणताही सुगावा लागला नाही, तसेच त्यांच्या क्रमांकावर संपर्क होऊ शकला नाही.

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार

मुलींचे मृतदेह कबरीतून काढून घर सजवले, कोण आहे हा 'इतिहासकार'?

दरम्यान, गुलाबीबाग पोलिसांनी हरियाणा राज्याची नंबर प्लेटची कॅब बेवारस स्थितीत जप्त केली. ही जप्ती शुक्रवारी सकाळी झाली. पोलिसांनी नंबर प्लेटच्या आधारे तपास सुरू केला असता, छाविनाथच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता ही कॅब छाविनाथची असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, भारत नगर परिसरातील एका नाल्यातून छाविनाथचा मृतदेहही सापडला आहे.

त्याच दिवशी आनंद पर्वत परिसरात अनिल यादव नावाच्या ड्रायव्हरचाही मृतदेह कॅबमध्ये सापडला होता. या दोन्ही केसेस सारख्याच होत्या. त्यामुळे मध्य जिल्हा पोलिसांनी आकाश आणि जुनैद या दोन चोरट्यांना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पाळत ठेवून अटक केली. त्यांच्यासह आणखी सूत्रधार प्रीतमचा पोलिस शोध घेत आहेत. चौकशीत या लोकांनी चोरीच्या मोबाईलवरून कॅब बुक केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा हेतू लुटमारीचा होता, त्यानंतर कॅब चालकाची हत्या करण्यात आली.

Web Title: Delhi murder of two cab drivers in one night 2 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.