धक्कादायक! लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीची लोखंडी रॉडने हत्या; चोवीस तासात दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:26 PM2023-07-28T14:26:03+5:302023-07-28T14:27:03+5:30
गुरुवारी रात्री एका महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर आता तरुणीची रॉडने हत्या करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या मालवीय नगरमध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कॉलेजसमोरच एका तरुणीच्या डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आली आहे. लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीने तरुणीवर हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी फरार आरोपीला ताब्यात घेतले आहे.
#WATCH | Chandan Chowdhary, Deputy Commissioner of Police, South Delhi, says "The incident took place inside the park. The deceased is a college student. She had come to the park with her friend. There are injuries on the deceased's head. A rod was also found near her body. We… pic.twitter.com/s0vZ4NQZHB
— ANI (@ANI) July 28, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव नरगिस असून, तिच्यावर आरोपी इरफानने रॉडने हल्ला केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना आज दुपारी 12 च्या सुमारास अरबिंदो कॉलेजजवळ एका मुलीची हत्या केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस तिथे गेले असता विजय मंडळ पार्कमध्ये एका मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा नरगिसच्या डोक्यातून रक्त येत होते. तिच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉडही सापडला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. रॉड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली.
महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वादी मालवीय यांचे ट्विट
दिल्ली में जहां एक महिला को उसके घर के बाहर गोली मारके उसकी हत्या की गई वहीं दूसरी तरह मालवीय नगर जैसे पॉश इलाक़े में लड़की को रॉड से मारा गया। दिल्ली बेहद असुरक्षित है। किसी को फ़र्क़ नहीं पड़ता। सिर्फ़ अख़बार की खबरों में लड़कियों के नाम बदल जाते हैं, अपराध नहीं रुकते।
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 28, 2023
कालही एकाची हत्या
दरम्यान, दिल्लीतील डाबरी येथे गुरुवारी(27) रात्री एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आशिष असे या हत्येतील आरोपीचे नाव असून त्याने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रेणू गोयल असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी रेणूचा मोबाईलही जप्त केला आहे. पोलीस त्याचा सीडीआर तपासत आहेत.