वर्गात व्यवस्थित बसायला सांगितल्याने विद्यार्थ्याने थेट शिक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:58 PM2021-09-20T14:58:01+5:302021-09-20T15:00:08+5:30
Delhi Crime News: पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकाने वर्गात नीट बसण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याने वर्गातच लोखंडी रॉडने शिक्षकाचं डोकं फोडल्याची घटना घडलीये. घटना पश्चिम दिल्लीतील बापरोला गावात घडली आहे.
पश्चिम दिल्लीच्या बापरोला गावातील शाळेत(दिल्लीमध्ये 12वी पर्यंत शाळाच असते) ही घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिक्षक विक्रांत हे बापरोला गावातील शाळेत शिकवतात. 18 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ललित नावाचा मुलगा वर्गात आला. तो आपल्या जागेवर नीट बसलेला नव्हता. विक्रांत यांनी ललितला वर्गात व्यवस्थित बसण्यास सांगितले. त्यानंतर ललितने रागात विक्रांत यांच्या डोक्यात लोखंड रॉड मारला. या घटनेत विक्रांत गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
https://t.co/7zJGMx4qj5
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
ढगफुटीमुळे अनेक घरांसह वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.#uttarakhand#cloudburst
12 वीत दोनवेळा नापास
प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विक्रांत यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून, आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी विद्यार्थी 21 वर्षीय असून, तो दोनवेळा बारावीत नापास झाला आहे.