पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:36 PM2021-04-27T17:36:54+5:302021-04-27T17:39:32+5:30

Delhi Crime : महिलेची हत्या करणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून तिचा पती आहे. त्याने त्याच्या ८ महिन्यांच्या पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली.

Delhi Nizamuddin firing assault pregnant woman death servant injured police crime | पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला

पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला

Next

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातलेलं असताना एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या (Husband Killed Pregnant Wife) केली. यादरम्यान त्याला रोखण्यासाठी आलेल्या तरूणावरही त्याने गोळी झाडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. जर तरूण गंभीर जखमी आहे. आरोपी व्यक्ती हे कृत्य केल्यावर तिथेच थांबून राहिला आणि पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. 

महिलेची हत्या करणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून तिचा पती आहे. त्याने त्याच्या ८ महिन्यांच्या पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली. पोलिसांनुसार, महिलेचं नाव शायना होतं. ती ८ महिन्यांची गर्भवती होती. शायना दोन दिवसांआधीच तिहार तुरूंगातून जामिनावर सुटून बाहेर आली होती. गर्भवती असल्यानेच तिला जामीन मिळाला होता. शायना एनडीपीएस एक्सनुसार तुरूंगात बंद होती. (हे पण वाचा : पूजा हत्याकांड केसमध्ये धक्कादायक खुलासा, पोलीस अधिकारी पती अन् दोन दिरांनीच केली हत्या!)

पोलिसांनुसार, एक वर्षाआधीच शायनाचं वसीमसोबत लग्न झालं होतं. पण शायना तुरूंगात गेली. त्यानंतर वसीम ओळख शायनाच्या मोठ्या बहिणीसोबत झाली आणि दोघेही सोबत राहू लागले होते. जेव्हा शायना तुरूंगातून बाहेर आली तेव्हा वसीम तिला भेटायला आला नव्हता. सोबतच शायनाला त्याच्या आणि बहिणीच्या नात्याबाबतही माहिती मिळाली होती. यावरून दोघांचं भांडण झालं होतं. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झालं. (हे पण वाचा : बिहार हादरलं! 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; 'तिला' शेतात फेकून आरोपी फरार)

भांडण सुरू असताना अचानक वसीमने पिस्तुल काढली आणि एकापाठी एक चार गोळ्या आपल्या गर्भवती पत्नीवर झाडल्या. वसीमने तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीवरही गोळी झाडली. एका तरूणाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरही त्याने गोळी झाडली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. शायनाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर तरूणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Delhi Nizamuddin firing assault pregnant woman death servant injured police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.