धक्कादायक! प्रेम प्रकरण घरी कळू नये म्हणून प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीची हत्या

By कुणाल गवाणकर | Published: January 24, 2021 03:14 PM2021-01-24T15:14:14+5:302021-01-24T15:22:26+5:30

खून करणारी मैत्रीण अटकेत; फरार प्रियकराचा शोध सुरू

delhi palwal friend murdered friend police arrest girl boyfriend absconding | धक्कादायक! प्रेम प्रकरण घरी कळू नये म्हणून प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीची हत्या

धक्कादायक! प्रेम प्रकरण घरी कळू नये म्हणून प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीची हत्या

Next

गुरुग्राम: दिल्लीपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पलवलमध्ये एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीची हत्या केली आहे. आपलं गुपित सर्वांसमोर येईल या भीतीनं मैत्रिणीनं तिच्या प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीला संपवलं. पोलिसांनी आरोपी मैत्रिणीला अटक केली आहे. तिच्या प्रियकराचा शोध सध्या सुरू आहे.

हरयाणातल्या पलवलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ऋतू आणि ज्योती एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. ज्योतीचे पवन नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. ही बाब ऋतूला माहीत होती. ऋतूनं ही गोष्ट घरी सांगेल अशी भीती ज्योतीला सतावत होती. याच भीतीतून ज्योती आणि पवननं ऋतूची हत्या केली. त्यांनी ऋतूचा मृतदेह आग्र्यातील एका कालव्याशेजारील झुडूपांमध्ये फेकून दिला.

अवैध संबंधात अडथळा ठरायचा पती; डोळे-नाक-कानात फेविक्विक टाकून निर्घृण हत्या

पोलिसांनी आरोपींविरोधात हत्या आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. ज्योतीला अटक करण्यात आली असून पवनचा शोध सुरू आहे. ऋतू बीएसस्सीची विद्यार्थिनी होती. ज्योतीनं पवनच्या मदतीनं गळा दाबून ऋतूचा खून केला. ऋतू घरी न आल्यानं तिचे वडील रमेशचंद यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. गुरुवारी सकाळी ९ वाजता ज्योतीसोबत निघालेली ऋतू घरी न परतल्यानं रमेशचंद पोलिसांत गेले.

लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक करणाऱ्या टाेळीला ठाेकल्या बेड्या

ऋतूचा शोध सुरू असताना पोलिसांना आग्र्यात एक मृतदेह सापडला. तो शवविच्छेदनासाठी नागरी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. ऋतूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्योती आणि पवन विरोधात खुनाचा गुन्हा दाखळ करण्यात आला. ज्योतीला पोलिसांनी अटक केली असून पवनचा शोध सुरू आहे.

Web Title: delhi palwal friend murdered friend police arrest girl boyfriend absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.