हिप्नोटाइज करून महिलांचे दागिने लुटायचे, आई अन् मुलाला पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:32 PM2021-04-19T16:32:38+5:302021-04-19T16:44:18+5:30
घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांना पीडित महिलेने सांगितले की, एका महिलेने आणि एका तरूणाने त्यांच्याकडील दागिने लुटले.
(छायाचित्र : प्रतिकात्मक)
दिल्ली पोलिसांनी हिप्नोटाइज करून लोकांना लुटणाऱ्या आई-मुलाला अटक केली आहे. दोन्ही माय-लेक सोबतू मिळून आपली शिकार शोधत होते. नंतर त्यांना हिप्नोटाइज करून त्यांचे दागिने आणि त्यांच्याकडील पैसे लुटत होते. पोलिसांनी या आई-मुलाच्या जोडीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की, त्यांनी आतापर्यंत किती लोकांना लुटलं आहे.
या दोघांचा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा या दोघांनी एका हॉस्पिटलमध्ये चोरी केली. ९ एप्रिलला सुजाता नावाची महिला पंडीत मदन मोहन मालवीय हॉस्पिटलमध्ये गेली होती. या दोघांनी सुजाताला हिप्नोटाइज करत आपल्या जाळ्यात फसवलं. त्यानंतर तिचा हार, अंगठी, कानातले काढले आणि ते घेऊन फरार झाले. (हे पण वाचा : बोंबला! पत्नीचं इन्स्टाग्राम चॅंटींग वाचून पती गेला 'कोमात', लग्नाच्या ९ दिवसांनंतर पोहोचला कोर्टात!)
घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांना पीडित महिलेने सांगितले की, एका महिलेने आणि एका तरूणाने त्यांच्याकडील दागिने लुटले. दोघांनी तिला हिप्नोटाइज केलं होतं. आणि त्यानंतर तिचे सर्व दागिने काढून ते फरार झाले.
पोलिसांनी या चोरीची चौकशी सुरू केली. तेव्हा हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरात दोघांचे चेहरे दिसले. नंतर आणखी चौकशी केली तेव्हा समोर आले की, दोघात आई आणि मुलाचं नातं आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पत्ता काढला आणि त्यांना अटक केली. हे दोघेही दागिने चोरून बाजारात विकत होते.