8वी पास झाला बनावट IPS, अनेकांची केली फसवणूक, UPSC विद्यार्थ्यांना पाहून आली आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:29 PM2022-12-19T19:29:22+5:302022-12-19T19:30:07+5:30

दिल्ली पोलिसांनी बनावट आयपीएस विकास यादव' याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. दिल्लीतील एका महिला डॉक्टरने विकास यादवविरोधात तक्रार दाखल केली होती.

delhi police arrested a fake ips officer who cheated people | 8वी पास झाला बनावट IPS, अनेकांची केली फसवणूक, UPSC विद्यार्थ्यांना पाहून आली आयडिया

8वी पास झाला बनावट IPS, अनेकांची केली फसवणूक, UPSC विद्यार्थ्यांना पाहून आली आयडिया

Next

दिल्ली पोलिसांनी बनावट आयपीएस विकास यादव' याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. दिल्लीतील एका महिला डॉक्टरने विकास यादवविरोधात तक्रार दाखल केली होती. विकास यादव हा खरा आयपीएस अधिकारी नाही. विकास हा बनावट आयपीएस बनून लोकांची फसवणूक करायचा, असं समोर आले आहे. सोशल मीडियावरही त्याने त्याचे फेक अकाउंट सुरू ठेवले आहे. 'आयपीएस विकास यादव' या नावाने हे अकाउंट आहे. 

विकास यादव हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील आहे. त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पण त्याने त्याच्या बनावट सोशल मीडिया अकाउंटवर खोटी माहिती दिली आहे. यात तो आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पास आऊट झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्याने स्वत:ला यूपी कॅडरचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक, असे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले आहे.

जुन्नरच्या बेल्हा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा; चार लाख रोख आणि ४९ तोळे सोनं लुटले

विकास यादव सोशल मीडियावर स्वतःबद्दल खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करत होता. फसवणुकीचे काही गुन्हे या आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात यापूर्वीही दाखल आहेत.

विकास यादवने आयपीएस असल्याचे भासवून बाहेरील दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयातील एका डॉक्टरला 25 हजार रुपयांना फसवले होते. याबाबत महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी विकास यादव याला अटक केली.

विकास यादव आठवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये आला होता. येथे तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करू लागला. मुखर्जी नगरमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्यांना पाहून त्याला हे सुचले. यानंतर त्याने सोशल मीडियावर 2021 बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करण्यास सुरुवात केली. विकास यादवला दिल्लीच्या सायबर सेलने अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे.

Web Title: delhi police arrested a fake ips officer who cheated people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.