कोण आहे सुकेशपेक्षाही मोठा ठग मृणांक? ऋषभ पंतसह अनेक दिग्गजांना लावलाय चुना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:28 PM2023-12-28T14:28:05+5:302023-12-28T14:31:39+5:30

देशातील वेगवेगळ्या फाइव्ह स्टार होटेल्समध्ये थांबण्याचा शोक, मॉडेल्स आणि मुलिंसोबत मौजमस्ती करणे, व्हिडिओ बनवणे आणि फोटो काढणे, अशी त्याची ओळख. 

delhi police arrested former cricketer mrinank singh fraud with Many legends including Rishabh Pant know all about him | कोण आहे सुकेशपेक्षाही मोठा ठग मृणांक? ऋषभ पंतसह अनेक दिग्गजांना लावलाय चुना!

कोण आहे सुकेशपेक्षाही मोठा ठग मृणांक? ऋषभ पंतसह अनेक दिग्गजांना लावलाय चुना!

ताज हॉटेलमध्ये बिलाच्या नावावर फसवणूक, भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतची 1.63 कोटी रुपयांची फसवणूक, असे अनेक आरोप असलेल्या आणि लोकांना धोका देण्यात मास्टर असलेल्या 25 वर्षीय मृणांक सिंहला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तो हाँकाँगला पळून जाण्याच्या तयारीत असताना एअरपोर्टवर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. खरे तर, कधी आयपीएस अधिकारी, कधी माजी रणजी क्रिक्रेटर, तर कधी आयपीएलमध्ये मुंबईसंघाचा खेळाडू. याशिवाय, देशातील वेगवेगळ्या फाइव्ह स्टार होटेल्समध्ये थांबण्याचा शोक, मॉडेल्स आणि मुलिंसोबत मौजमस्ती करणे, व्हिडिओ बनवणे आणि फोटो काढणे, अशी त्याची ओळख. 

क्रिकेटर बनून हॉटेल ताजमध्ये थांबला -
मृणांकला देशातील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची आवड आहे. त्याने अनेक हॉटेल्समध्ये राहून तेथील मालक आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तो बिल न देताच निघून जातो. गेल्या वर्षी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात मृणांकविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. मृणांक सिंगवर 22 ते 29 जुलै 2022 या दरम्यान ताज हॉटेलमध्ये राहण्याचे अंदाजे 5.5 लाख रुपयांचे बिल न भरल्याचा आरोप आहे. तो क्रिकेटर म्हणून हॉटेलमध्ये थांबला होता.

मृणांकला बिल मागितले असता, त्याने एक खाजगी स्पोर्टस वियर कंपनी पैसे देणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याने ऑनलाइन बिल भरल्याचे सांगितले, पण हॉटेलला हे पैसे मिळालेच नाही. हॉटेलने पुन्हा सिंह आणि त्यांचे व्यवस्थापक गगन सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, क्रिकेटपटूचा ड्रायव्हर रोख घेऊन जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, कुणीही आले नाही. यानंतर सिंह यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्यात आला. मात्र त्याने दर वेळा खोटी आश्वासने. अखेर त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आधीही झाली होती अटक -
लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मृणाक सिंगला मुंबई आणि पंचकुला पोलिसांनी यापूर्वीही अटक केली होती. मृणांकने नॉर्थ कॅम्पस कॉलेजमधून बी.कॉम केले आहे. त्यांनी राजस्थानमधून एमबीए केले. त्याच्यावर यापूर्वी मुंबईतील जुहू, हरियाणातील कर्नाल आणि पंजाबमधील मोहाली येथे तीन गुन्हे दाखल आहेत.

मोबाईलमध्ये काय काय आढळलं? -
अतिरिक्त डीसीपींच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांच्या यादीत हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मुली, कॅब ड्रायव्हर, खाद्यपदार्थांची छोटी दुकाने आणि इतरही काही लोकांचा समावेश आहे. आरोपी, 2021 मध्ये हरियाणासाठी रणजी ट्रॉफी खेळल्याचा आणि मुंबई इंडियन्सकडून 2014 ते 2018 पर्यंत IPL चा भाग होता, असा दावा करत होता. एवढेच नाही, तर त्याच्या मोबाईलच्या प्राथमिक तपासणीत तो तरुण महिला मॉडेल्स आणि मुलींशी परिचित होता. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आढळून आल्याचेही, संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
 

Web Title: delhi police arrested former cricketer mrinank singh fraud with Many legends including Rishabh Pant know all about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.