मैत्री...लग्नाचं आश्वासन, मग प्रायव्हेट फोटो लीक करण्याची धमकी; लाखो लुटले आहेत आरोपीने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:40 PM2022-01-22T18:40:44+5:302022-01-22T18:46:06+5:30

Delhi Crime News : तरूणींचा विश्वास बसला की, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे वसूल करत होता. पैसे न दिल्यास त्यांचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देत होता.

Delhi police arrested man blackmail woman private photo video leak matrimony site | मैत्री...लग्नाचं आश्वासन, मग प्रायव्हेट फोटो लीक करण्याची धमकी; लाखो लुटले आहेत आरोपीने

मैत्री...लग्नाचं आश्वासन, मग प्रायव्हेट फोटो लीक करण्याची धमकी; लाखो लुटले आहेत आरोपीने

googlenewsNext

Delhi Crime News : दिल्ली पोलिसांनी एका बीटेक आणि एमबीए झालेल्या तरूणाला अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, तो तरूणींना ब्लॅकमेल करत होता. आरोपी आधी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर जाऊन तरूणींसोबत मैत्री करत होता. मग त्यांना लग्नाचं आश्वासन देत होता. मग तरूणींचा विश्वास बसला की, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे वसूल करत होता. पैसे न दिल्यास त्यांचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देत होता.

पोलिसांनुसार, एका तरूणीने आरोपीसोबत मैत्री केली होती आणि दोघांचं लग्न होणार होतं. यावेळी प्रायव्हेट चॅंटींगवेळी काही फोटोग्राफ शेअर केले होते. त्याच फोटोंमा मॉर्फ करून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत होता. या तरूणीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि त्याचा मोबाइल चेक केला तर त्यात अनेक तरूणींचे प्रायव्हेट व्हिडीओ आणि नग्न फोटो होते.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, शाहदरा पोलीस स्टेशनमध्ये एका ३२ वर्षीय तरूणीने तक्रार दाखल केली होती की, ऑक्टोबर २०२१ मध्ये एका मॅट्रिमोनिअल साइटवर तिची भेट साहिल सचदेव नावाच्या तरूणासोबत झाली होती. साहिलने सांगितलं होतं की, तो उत्तरप्रदेशच्या सहारनपूरचा राहणारा आहे. सोबतच त्याने सांगितलं की, तो बीटेक आणि एमबीए झाला आहे.

यादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि आरोपी साहिलने तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं. दोघे व्हिडीओ कॉलवर बोलू लागले होते. यादरम्यान त्याने तरूणीचे काही प्रायव्हेट फोटो आपल्याकडे ठेवले. मग हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करू लागला. महिलेने त्याला दोन लाख रूपये दिले होते.

महिलेच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि आरोपी साहिलचा शोध घेऊ लागले. पोलिसांनुसार, आरोपी साहिल फारच हुशार होता आणि सतत आपलं ठिकाण बदलत होता. पण टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने पोलिसांनी आरोपी साहिलला दिल्लीच्या साकेत भागातून अटक केली.

चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, तो बेरोजगार आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून मॅट्रिमोनिअल साइटवर जाऊन आपलं प्रोफाइल बनवत होता आणि नोकरी करणाऱ्या महिलांना टारगेट करत होता. पोलिसांनुसार, मोबाइलमधून आतापर्यंत माहिती मिळाली की, याआधी त्याने तीन तरूणींची अशी फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेतले.

आरोपीच्या फोनमधून ४ महिलांचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मिळाले आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. त्याने एकूण किती महिलांना असं ब्लॅकमेल केलं याचा तपास करत आहेत. पोलिसांनी साहिलचा फोन जप्त केला आहे. 
 

Web Title: Delhi police arrested man blackmail woman private photo video leak matrimony site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.