दिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 06:35 PM2020-04-01T18:35:19+5:302020-04-01T18:37:14+5:30

तीन दिवस सुरु असलेल्यानंतर 2361 लोकांना येथून हलविण्यात आले आहे.

Delhi police came to wake, after the Tabliki A Jamaat case, 200 persons were removed from Gurdwara pda | दिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर

दिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर

Next
ठळक मुद्देदिल्लीतील मजनू का टीला गुरुद्वारामध्ये अडकलेल्या 200 लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. दिल्लीतील मजनू का टीलामध्ये शीख समुदायाचे 200 लोक अडकले होते.

नवी दिल्ली - दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. तबलिगी जमातचा मरकजला खाली करण्यात आले. तीन दिवस सुरु असलेल्यानंतर 2361 लोकांना येथून हलविण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीतील मजनू का टीला गुरुद्वारामध्ये अडकलेल्या 200 लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. वास्तविक, निजामुद्दीन प्रकरणातील चर्चेनंतर आता दिल्ली पोलिस कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत.

दिल्लीतील मजनू का टीलामध्ये शीख समुदायाचे 200 लोक अडकले होते. अनेक परदेशी लोकही यात सामील आहेत. दिल्ली पोलीस आणि पंजाब सरकारच्या प्रतिनिधींनी लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांना बस भरल्यानंतर नेहरू विहारमधील शाळेत हलविण्यात येत आहे. या शाळेत क्वारंटाईन केंद्र बांधले गेले आहे.

यापूर्वी, तीन दिवस चाललेल्या कारवाईनंतर निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या  2361 लोकांना बाहेर काढण्यात आले. यापैकी 617 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त उर्वरित लोकांना क्वारंटाईन केंद्रावर नेण्यात आले आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली- नोएडामध्येही स्थिती चांगली नाही. दिल्लीतील सरकारी रुग्णालयात डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. हा डॉक्टर दिल्ली राज्य कर्करोग रुग्णालयात कार्यरत होता. येथे सध्या ओपीडी बंद आहे. यापूर्वी मोहल्ला क्लिनिकचे 2 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

त्याचवेळी गौतम बुद्ध नगरमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. अशा प्रकारे गौतम बुद्ध नगरात कोरोना बाधितांची संख्या 41 झाली आहे. दरम्यान, गाझियाबादमध्ये आरोग्य विभागाने नोएडाच्या सीझफायर कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व 15 लोकांना वेगवेगळ्या भागात रुग्णालयात क्वारंटाईन करून ठेवले आहे.

Web Title: Delhi police came to wake, after the Tabliki A Jamaat case, 200 persons were removed from Gurdwara pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.