रेस्टॉरंटमध्ये होता नोकर, मग स्वत:ला IPS असल्याचं सांगून इंस्टावर बनवले 20K फॉलोअर्स अन् महिलांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 03:14 PM2022-12-19T15:14:43+5:302022-12-19T15:18:34+5:30

मध्य प्रदेशच्या ग्वालियार येथे राहणारा विकास गौतमचं शिक्षण फक्त इयत्ता ८ वीपर्यंतच झालं आहे.

delhi police caught fake ips officer vikash yadav used to trap women and make them victims | रेस्टॉरंटमध्ये होता नोकर, मग स्वत:ला IPS असल्याचं सांगून इंस्टावर बनवले 20K फॉलोअर्स अन् महिलांना...

रेस्टॉरंटमध्ये होता नोकर, मग स्वत:ला IPS असल्याचं सांगून इंस्टावर बनवले 20K फॉलोअर्स अन् महिलांना...

googlenewsNext

नवी दिल्ली-

मध्य प्रदेशच्या ग्वालियार येथे राहणारा विकास गौतमचं शिक्षण फक्त इयत्ता ८ वीपर्यंतच झालं आहे. पण तो स्वत:ला कानपूर आयआयटीमधून (IIT) उत्तीर्ण झाल्याचं सांगायचा आणि आपण उत्तर प्रदेश कॅडरचा आयपीएस ऑफीसर असल्याचं भासवून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. महिलांना आपली खोटी ओळख दाखवून त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मग पैसे लाटायचे असा कारनामा विकास गौतम करत होता. आरोपी गौतम विरोधात संपूर्ण उत्तर प्रदेश आणि ग्वालियारमध्ये फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. 

विकास गौतम स्वत:ला आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून दिल्लीच्या संजय गांधी रुग्णालयातील डॉक्टरकडून २५ हजार रुपये लाटले होते. ज्याची तक्रार डॉक्टर महिलेनं पोलिसांत केली होती. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करत विकास याला अटक केली आहे. विकास गौतम यानं फेसबुक आणि इस्टाग्रामवर विकास यादव आयपीएस नावानं खोटी प्रोफाइल तयार केली आहे. खरंतर विकास गौतम इयत्ता आठवीपर्यंतच शिकला आहे आणि आयटीआयमधून वेल्डिंगचं ट्रेनिंग घेतलं आहे. 

इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण घेतलं आणि नंतर तो दिल्लीच्या मुखर्जी नगर परिसरात शिफ्ट झाला. जिथं तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करू लागला. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीत प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी येत असतात. जे येथील बड्या कोचिंग क्लासेसमध्येही अॅडमिशन घेत असतात. नुकतंच यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय विभागातून झालेलं होतं. त्यातूनच विकास गौतम स्वत:ला आयआयटी कानपूर पासआऊट असल्याचं सांगू लागला. त्यानंतर २०२१ च्या बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून सोशल मीडियात एक फेक प्रोफाइल बनवली आणि महिलांना जाळ्यात ओढू लागला. दिल्लीच्या सायबर सेलनं विकासला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.  

Web Title: delhi police caught fake ips officer vikash yadav used to trap women and make them victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.