आधी मैत्री,नंतर प्रेम, शारीरिक संबंध, अल्पवयीन मुलगी प्रेगनंट; घरच्यांचा लग्नाला नकार अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 06:21 PM2023-03-25T18:21:33+5:302023-03-25T18:23:15+5:30
१७ वर्षाच्या मुलीच १५ वर्षाच्या मुलासोबत मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं.
१७ वर्षाच्या मुलीच १५ वर्षाच्या मुलासोबत मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्यात शारीरिक संबंध झाले. मुलगी प्रेगनंट झाली. या दोघांना याची माहिती झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोघेही घाबरले. दोघेही वेगवेगळ्या समाजातील आहेत. घरचे लग्नासाठी तयार होणार नाहीत याची भीती दोघांना होती. यामुळे दोघांनी शहर सोडायचा निर्णय घेतला. दोघांनी पुण्याला जाणारी ट्रेन पकडली.
या दोघांची ट्रेनमध्ये ओळखपत्र तपासण्यात आले, यात हे दोघंही अल्पवयीन असल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर दोघांना मथुरा स्थानकावर उतरवण्यात आले. या प्रकरणाची दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली. कांजवाला पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १७ वर्षीय मुलगी दिल्लीतील रोहिणीच्या कांझावाला भागात कुटुंबासह भाड्याने राहते. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. मुलगी चार भावंडांमध्ये ही मुलगी मोठी आहे. आई-वडील दोघेही नोकरी करतात. मुलगीही आईसोबत काम करते. एका मित्राच्या माध्यमातून मुलीची ओळख एका १५ वर्षांच्या मुलाशी झाली. तो मुलगा उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांमध्ये जवळपास वर्षभरापासून मैत्री आहे. मुलीने त्याला तिच्या कारखान्यात नोकरीही मिळवून दिली.
'कामाच्या ठिकाणी मुलाने लग्नासाठी प्रपोज केल्याच मुलीने पोलिसांना सांगितले. यानंतर आमच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. कारखान्यात कोण नसायचे तेव्हा दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर ती मुलगी गरोदर राहिली, याची माहिती तिने मुलाला दिली. या मुलाने कांजवाला परिसरातच भाड्याने खोली घेतली. कामाच्या निमित्ताने ती दिवसभर मुलाच्या खोलीत राहायची. मुलगा नोकरीला निघायचा. २० मार्च रोजी वडिलांनी मुलीला शिवीगाळ केली. याच निमित्तावरून ती घरातून निघून गेली. मुलगा आणि ती नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून पुण्याला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. ट्रेनमध्ये चेकिंग करताना संशय आल्यावर त्यांचे ओळखपत्र विचारले, त्यावरून हे दोघे अल्पवयीन व गर्भवती असल्याचे उघड झाले.
यानंतर या दोघांना मथुरा स्थानकात सोडण्यात आले आणि दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीचे वैद्यकीय आणि समुपदेशन केले. मुलीने पोलिसांना निवेदन दिले की ती स्वतःच्या इच्छेने नातेसंबंधात आहे आणि तिला त्या मुलाशी लग्न करायचे आहे. पोलिसांनी तपास केला असता मुलाचे वय १५ वर्षे असल्याचे समोर आले.