मेस्सीची दिल्लीत चोरी; फुटबॉलपटूने लंपास केले ५६ मोबाईल्स, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 04:48 PM2022-12-22T16:48:32+5:302022-12-22T16:49:03+5:30

दिल्ली पोलिसांनी चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव मेस्सी आहे.

delhi police football player messi arrested along with accomplices in theft case recovered 56 mobile phones | मेस्सीची दिल्लीत चोरी; फुटबॉलपटूने लंपास केले ५६ मोबाईल्स, नेमकं प्रकरण काय?

मेस्सीची दिल्लीत चोरी; फुटबॉलपटूने लंपास केले ५६ मोबाईल्स, नेमकं प्रकरण काय?

Next

दिल्ली पोलिसांनी चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव मेस्सी आहे.  दिल्ली पोलिसांनी फुटबॉलपटू मेस्सीला त्याच्या साथीदारांसह अटक केली आहे. त्याच्या अटकेने 55 गुन्हे उघडकीस आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या चित्तरंजन पार्क पोलीस ठाणेत फुटबॉलपटू मेस्सीला शस्त्रासह अटक केली आहे, पण हा मेस्सी महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नाही, तर हा मेस्सी आणखी एक फुटबॉलपटू आहे, जो दिल्लीतील आपल्या साथीदारांसह मोबाईल फोन चोरीचा मास्टर आहे. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सीआर पार्क पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मेस्सी टोळीच्या प्रमुखाला त्याच्या टोळीतील चार जणांसह अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या मेस्सी फुटबॉलर असून त्याचे खरे नाव पिंकू आहे. टोळीचा म्होरक्या पिंकू मेस्सी हा स्वतः फुटबॉलपटू आहे. तो मेस्सीचा कट्टर चाहता आहे, त्यामुळे त्याने स्वत:चे नावही महान फुटबॉलपटू मेस्सीच्या नावावर ठेवले आहे.

कोयता गँगनंतर अवैध धंदे ही सुस्साट; हडपसर परिसरात गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

पिंकू उर्फ ​​मेस्सीने आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक  मोबाईल चोरले आहेत. तो दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिल्लीच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये महागडे फोन घेऊन लोकांना लक्ष्य करत असे. या टोळीच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी 56 गुन्ह्याचा छडा लावला आहे. या टोळीकडून 56 फोन जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या साथीदारांनाही अटक केली आहे. 

Web Title: delhi police football player messi arrested along with accomplices in theft case recovered 56 mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.