Video - पर्स घेऊन पळत होते चोरटे; पोलिसाने लाथ मारून खाली पाडली स्कूटर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:05 AM2023-09-27T11:05:16+5:302023-09-27T11:11:25+5:30

मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली.

delhi police off duty police man kicked chain snatcher in new delhi model twon area | Video - पर्स घेऊन पळत होते चोरटे; पोलिसाने लाथ मारून खाली पाडली स्कूटर अन्...

Video - पर्स घेऊन पळत होते चोरटे; पोलिसाने लाथ मारून खाली पाडली स्कूटर अन्...

googlenewsNext

दिल्लीत एका पोलिसाने लाथ मारून स्कूटरवरून पळणाऱ्या दोन चोरांना पकडलं आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली. दिल्ली पोलिसांच्या संपर्क शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अजय झा घटनेच्या वेळी मॉडेल टाऊन मार्केटमधील एका दुकानात किराणा सामान खरेदी करत होते. 

पोलिसांनी सांगितले की, तेव्हा शेजारच्या दुकानात उभ्या असलेल्या अजय झा यांनी लोक “चोर, चोर” असं ओरडत असल्याचं ऐकलं. एका स्कूटरवरून दोन जण वेगाने धावत असल्याचे त्यांनी पाहिले. एएसआय अजय झा यांच्या धाडसी कृत्याचे संपूर्ण दृश्य जवळच्या दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हिडिओमध्ये अजय झा दोन्ही चोरांना रोखण्याचा धाडसी प्रयत्न करताना दिसत आहे. 

अजय झा यांनी वाहन पाहिलं आणि पूर्ण ताकदीने लाथ मारली, त्यामुळे वाहनासह दोन्ही चोरटे जमिनीवर पडले. लाथ मारल्याने एएसआय झाही जमिनीवर पडले. त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला. दोन्ही चोरट्यांची ओळख पटली आहे. महेश आणि सिकंदर अशी त्यांची नावे आहेत. जमिनीवर पडल्यानंतर दोन्ही चोरटे उठून पळू लागले, मात्र जमावाने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अजय झा यांच्या अंगठ्याला आधीच दुखापत झाली होती. घटनेपूर्वीच्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये अजय झा यांनी उजव्या हाताच्या अंगठ्यात सपोर्टर घातल्याचे दिसून येते. त्याचवेळी स्कूटरला लाथ मारल्याने ते उजव्या हातावर पडले, त्यामुळे त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला असावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: delhi police off duty police man kicked chain snatcher in new delhi model twon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.