सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 21:46 IST2021-05-31T21:46:06+5:302021-05-31T21:46:46+5:30
Sushil Kumar Arrest : हत्येनंतर फरार झालेला सुशील कुमार हरिद्वार येथील एका आश्रमात लपून बसला होता.

सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशील कुमारच्या प्रकरणात आता दिल्ली पोलीस सुशीला घेऊन उत्तराखंडला पोहचले आहेत. हत्येनंतर फरार झालेला सुशील कुमार हरिद्वार येथील एका आश्रमात लपून बसला होता.
सुशील कुमार तब्बल १८ दिवस फरार होता. या १८ दिवसांमध्ये तो कोणत्या लोकांना भेटला, त्याचबरोबर कोणत्या लोकांनी त्याला मदत केली, या गोष्टीही अजून पोलिसांना समजू शकलेल्या नाहीत. त्यासाठी दिल्लीपोलिसांचे पथक सुशीलला घेऊन उत्तराखंडला पोहचले आहेत. पोलिसांना तेथूनच त्याचा मोबाईल फोन हाती लागण्याची शक्यता आहे.
सुशील कुमार जेव्हा फरार होता, तेव्हा तो एका मोबाईचा वापर करत होता. या मोबाईलमुळेच तो आपल्या जवळच्या व्यक्तींना संपर्क करत होता. पण हा मोबाईलही अजून पोलिसांना सापडलेला नाही. या मोबाईमध्ये डोंगल वापरून सुशील कुमार इंटरनेट कॉल्सच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या संपर्कात होता. या मोबाईलचा शोध लवकरच लागण्याची शक्यता आहे.