दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:03 PM2024-10-10T21:03:46+5:302024-10-10T21:03:57+5:30

Delhi Police seized Cocaine: गेल्या आठवड्यात पोलिसांनी 5000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.

Delhi Police Seized Cocaine: worth Rs 2000 crore, second in a week | दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई

Delhi News: दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलला ड्रग्जविरोधातील मोहिमेत पुन्हा मोठे यश मिळाले आहे. रमेश नगर भागातील एका गोदामातून पोलिसांनी सुमारे 200 किलो कोकेन जप्त केले आहे. बाजारात याची किंमत तब्बल 2000 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी आठवडाभरात मिळवलेले हे दुसरे मोठे यश आहे. गेल्या आठवड्यात महिपालपूर येथून 560 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल 5000 कोटी रुपये होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या सिंडिकेटशी संबंधित सातव्या आरोपीला अटक केली आहे. अखलाख असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील हापूरचा रहिवासी आहे. अखलाखची चौकशी केल्यानंतरच स्पेशल सेलने दिल्लीतील रमेश नगरमध्ये छापा टाकून 200 किलो कोकेन जप्त केले.

महिपालपूरमध्ये कोकेन सापडल्यानंतर खळबळ 
यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील महिपालपूर भागातील एका गोदामातून 560 किलोहून अधिक कोकेन आणि 40 किलो 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त केला होता. यामध्ये सामील एक आरोपी युवक काँग्रेसचा माजी सदस्य आहे. यावरुन राजकारण सुरू झाले असून, भाजप काँग्रेसवर टीका करत आहे. तर, काँग्रेसने त्या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले आहे.

कॉन्सर्ट आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर
स्पेशल सेलने तुषार गोयल, हिमांशू कुमार आणि औरंगजेब सिद्दिकीला दिल्लीतून अटक केली होती. तर एक आरोपी मुंबईचा रहिवासी आहे. या प्रकरणात तुषार गोयल हा या सिंडिकेटचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सिंडिकेट दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांमध्ये कॉन्सर्ट आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

Web Title: Delhi Police Seized Cocaine: worth Rs 2000 crore, second in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.