मोठा खुलासा: सलमान खानला शूट करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता संपत नेहरा, पण पिस्तुल....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:01 PM2022-06-11T16:01:40+5:302022-06-11T16:01:57+5:30

Salman Khan threat case : लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये एजन्सीकडून चौकशी करण्यात आली होती. ज्यात सलमान खानच्या हत्येचं षडयंत्र रचल्याचं लॉरेन्सने कबूल केलं होतं आणि सांगितलं होतं की, त्याने सलमान खानला मारण्यासाठी राजस्थानचा गॅंगस्टर संपत नेहरा याला जबाबदारी दिली होती.

Delhi police special cp revelation on Salman Khan threat case and Lawrence Bishnoi | मोठा खुलासा: सलमान खानला शूट करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता संपत नेहरा, पण पिस्तुल....

मोठा खुलासा: सलमान खानला शूट करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता संपत नेहरा, पण पिस्तुल....

Next

सलमान खानला (Salman Khan) धमकी आणि सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala Murder Case) हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. स्पेशल सीपी एचजीएस धारीवाल यांनी ज्या स्प्रिंग रायफलबाबत सांगितलं आहे त्याबाबत लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) नुकतंच चौकशी दरम्यान कबूल केलं. लॉरेन्स बिश्नोईची 2021 मध्ये एजन्सीकडून चौकशी करण्यात आली होती. ज्यात सलमान खानच्या हत्येचं षडयंत्र  (Salman Khan threat case) रचल्याचं लॉरेन्सने कबूल केलं होतं आणि सांगितलं होतं की, त्याने सलमान खानला मारण्यासाठी राजस्थानचा गॅंगस्टर संपत नेहरा याला जबाबदारी दिली होती.

ज्यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला आणि सलमान खानच्या घराची रेकी केली. पण जास्त अंतर असल्याने तो सलमान खानपर्यंत पोहोचू शकला नाही. तेच संपतकडे जी पिस्तुल होती त्याने तो जास्त अंतरावर निशाणा लावू शकत नव्हता.

एचजीएस धारीवाल यांनी पुढे सांगितलं की, त्यानंतर संपत नेहराने आपल्या गावातील दिनेश फौजीच्या माध्यमातून आरके स्प्रिंग रायफल मागवली. स्प्रिंग रायफल लॉरेन्स बिश्नोईने अनिल पांड्याकडून 3 ते 4 लाख रुपयात खरेदी केली होती. रायफल दिनेश फौजीकडे ठेवली होती जी पोलिसांना सापडली आणि संपत नेहराला अटक झाली.

तेच सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाबाबत धारीवाल म्हणाले की, यावर स्पेशल टीम काम करत आहे. अशा केसवर आधीही काम केलं गेलं आहे. संदीप आणि विक्कीला हत्येप्रकरणी सेलने अटक केली होती. लॉरेन्स गॅंगला आधीच पकडलं आहे. सहा शूटर्सची ओळख पटली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 8 लोकांची जी लिस्ट होती, त्यातील चार लोकांची भूमिका स्पष्ट झाली आहे. 

महाराष्ट्रात सौरभ महाकालची जी चौकशी झाली त्यातून दोन शूटर, संतोष आणि नवनाथ सूर्यवंशीबाबत माहिती समोर आली आहे. महाकालने सांगितलं की, दोघांचा 3-3 लाख आणि त्याला 50 हजार रूपये देण्यात आले होते. विक्रम बराडनेच हत्येची जबाबदारी शूटर्सना दिली होती. 

Web Title: Delhi police special cp revelation on Salman Khan threat case and Lawrence Bishnoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.