कॉलर पकडल्यानं रागात होता सुशील, बदला घेण्यासाठी बोलावले गुंड; जाणून घ्या, 'त्या' रात्री नेमकं काय घढलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:49 AM2021-05-27T08:49:53+5:302021-05-27T08:52:49+5:30
4 मेरोजी कुख्यात गँगस्टर काला जठेडीचे भाऊ सोनू, रविंद्र आणि इतरांचा मॉडेल टाऊनच्या फ्लॅटवरून पैलवान सुशील कुमार सोबत वाद झाला होते. त्या लोकांनी सुशीलची कॉलरही पकडली होती. एवढेच नाही, तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत पळवूनही लावले होते. (Sagar rana murder case)
नवी दिल्ली - पैलवान सागर राणा हत्या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 4 मेरोजी पैलवान सागरची हत्या झाली होती. तपासातून समोर आले आहे, की त्या दिवशी छत्रसाल स्टेडियमवर काही लोकांनी सुशील कुमारचा अपमान केला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी त्याने हरियाणाहून गंड बोलावले होते. रात्री या गुंडांनी केलेल्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला होता.
4 मेरोजी कुख्यात गँगस्टर काला जठेडीचे भाऊ सोनू, रविंद्र आणि इतरांचा मॉडेल टाऊनच्या फ्लॅटवरून पैलवान सुशील कुमार सोबत वाद झाला होते. त्या लोकांनी सुशीलची कॉलरही पकडली होती. एवढेच नाही, तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत पळवूनही लावले होते. या अपमानामुळे सुशील रागाने लालबुंद झाला होता. खुन्नस आणि तणावात आल्याने त्याने त्याच दिवशी बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने कुख्यात नीरज बवाना आणि असौदा गिरोहच्या गुंडांची मदत घेतली.
महिला खेळाडूचे कनेक्शन उघड; अटक कुस्तीपटू सुशील कुमारला मदत केल्याचा संशय
पोलिसांचे म्हणणे आहे, की 4 मेरोजी दिवसा सुशील कुमार छत्रसाल स्टेडियमवर आला होता, तेव्हा त्याच्यासोबत फार पैलवान नव्हते. स्टेडियमवर अचानकच त्याची सोनू, सागर, अमित, भक्तू, रविन्द्र आणि विकास यांच्याशी शाब्दिक वाद झाला. येथे सुशीलचा जबरदस्त अपमानही केला गाले. त्यावेळी तर सुशील स्टेडियमवरून निघून गेला, मात्र, अपमानाचा बदला घेण्याचे त्याने ठरवले. अजय आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने गुंडांना फोन करून हरियाणाहून दिल्लीला बोलावून घेतले. सर्वप्रथम कुण्या एकाठिकाणी हे सर्व जण जमले. काहींनी तेथे दारू घेतली आणि जेवणही केले.
यानंतर 5-6 कारने हे लोक रात्री 12 वाजताच्या सुमारास शालीमार बाग येथे रविंद्रच्या घरी पोहोचले. त्यावेळी रविंद्र आपल्या घराखाली असलेल्या एका दुकानासमोर आइस्क्रिम खात होता. रविंद्र आणि त्याचा साथीदार विकासला हे गुंड आपल्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. यानंतर सर्वच मॉडेल टाउन येथील सोनूच्या फ्लॅटजवळ पोहोचले.
हत्येचे नाट्यरूपांतर करून सुशील कुमारची चौकशी, छत्रसाल स्टेडियममध्ये ठोस पुरावे शोधण्याचे प्रयत्न
तेथून सोनू, सागर, अमित आणि भक्तू यांना कारमध्ये बसवून सर्वांना रात्री साधारणपणे 1 वाजता छत्रसाल स्टेडियमवर नेले गेले. यानंतर येथीलपार्किंग भागात या सर्व सहा पैलवानांना सुशील आणि त्याच्या गुंडांनी काठ्या, दांडे, हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी सागर, सोनू आणि इतर लोकांना जनावराप्रमाणे मारहाण केली होती. एवढेच नाही, तर सोनूला मुत्र पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. याच मारहाणीत सागर राणाचा मृत्यू झाला आहे.