Delhi Murder Case: पोटाचे आतडे बाहेर आले, कवटीत चाकू भोसकला, दगडाने ठेचलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 05:19 PM2023-06-04T17:19:56+5:302023-06-04T19:24:02+5:30
Delhi Murder Case: आरोपी साहिलने किती क्रूरपणे मुलीची हत्या केली, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे.
Delhi Murder Case:दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 28 मे रोजी 16 वर्षीय मुलीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. त्या हत्येची भीषणता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी साहिल याने साक्षीवर अनेक वार केले, यात तिच्या पोटातून आतडे बाहेर आले. एवढेच नाही, तर त्याने चक्क डोक्यात(मेंदूत) चाकू भोसकला.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय
वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, पोलिसांना हॉस्पिटलमधून 16 ते 17 पानांची रिपोर्ट मिळाली आहे, ज्यामध्ये साहिलच्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून आले आहे की, साहिलचे हल्ले इतके गंभीर आणि क्रूर होते की पीडितेचे आतड्यांसह अंतर्गत अवयवही बाहेर आले.
आरोपी साहिलने अल्पवयीन मुलीवर चाकूने अनेक वार केल्याचे अहवालात उघड झाले आहे. त्याने पीडितेच्या डोक्यात वार केले आणि नंतर तिला दगडानेही ठेचले. पीडितेच्या शरीरावरील जखमांच्या खुणा याची पुष्टी करतात. तिच्या कवटीमध्ये क्रॅक आढळले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये साहिलने तिच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या शरीरावर चाकूच्या 16 जखमांपैकी सर्वाधिक जखमा खांद्यावर आणि कमरेला आहेत. तसेच त्याच्या शरीरात अनेक हाडे तुटलेली आढळून आली.
नेमकी घटना काय ?
28 मे रोजी साहिल नावाच्या 20 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय साक्षीची अनेक वेळा वार करून हत्या केली आणि तिचे डोके दगडाने ठेचले. नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात ही भीषण घटना घडली. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी यूपीतील बुलंदशहर येथून अटक केली. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते, ज्यात साहिल मुलीवर चाकूने अनेक वेळा वार करताना दिसत आहे.