धक्कादायक! दिल्लीत मॉलमध्ये वेश्याव्यवसाय,३००० रुपयांत सेक्स सर्व्हिस; स्पामध्ये सुरू होता व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 03:55 PM2023-03-26T15:55:13+5:302023-03-26T15:55:56+5:30

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

delhi sex racket busted at nirman vihar spa in v3s mall two arrested | धक्कादायक! दिल्लीत मॉलमध्ये वेश्याव्यवसाय,३००० रुपयांत सेक्स सर्व्हिस; स्पामध्ये सुरू होता व्यवसाय

धक्कादायक! दिल्लीत मॉलमध्ये वेश्याव्यवसाय,३००० रुपयांत सेक्स सर्व्हिस; स्पामध्ये सुरू होता व्यवसाय

googlenewsNext

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, दिल्लीतील एका मॉलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची घटना उघडकीस आली. एका स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेस सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. 

दिल्ली पोलिसांना या संदर्भात अगोदरच माहिती मिळाली होती. यानंतर दिल्ली आणि प्रीत विहार पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने स्पामध्ये छापा टाकला. यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. एका बनावट ग्राहकाने स्पासोबत डील फायनल करताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. स्पाचा मॅनेजर अजय सिंग हा फरार आहे.

"सर, प्लीज मला प्रेयसीपासून वाचवा, ती माझ्याशी लग्न करतही नाही आणि दुसरीसोबतही करून देत नाही"

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "स्पामध्ये एकूण ९ तरुणी आढळल्या आहेत. स्पाचा व्यवस्थापक अजय सिंग फरार आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, २४ मार्च रोजी एका मॉलमधील ट्रू ब्लिस स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवले होते. सुरुवातीला त्या ग्राहकाकडून १ हजार रुपये घेतले. यानंतर त्याला ९ तरुणी दाखवल्या त्यापैकी एक निवडण्यास सांगितले. बनावट ग्राहकाकडून त्यांनी आणखी २ हजार रुपये घेतले. तेव्हाच बनावट ग्राहकाने मिस्ड कॉल देऊन पोलीस टीमला अलर्ट केले, त्यानंतर टीमने स्पावर छापा टाकला आणि आरोपीला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्पा सेंटर गेल्या दोन वर्षापासून चालवले जात आहे. याअगोदरही या स्पाविरोधात कारवाई केली होती. 

Web Title: delhi sex racket busted at nirman vihar spa in v3s mall two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.