धक्कादायक! डास मारण्याची कॉईल पेटवून कुटुंब झोपले, गुदमरून ६ जणांचा झाला मत्यू; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:35 PM2023-03-31T12:35:20+5:302023-03-31T12:36:46+5:30
दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आपल्याकडे डासांपासून वाचण्यासाठी अनेक पर्याय केले जातात. यात कॉइल हा एक पर्याय आहे, रात्री अनेकजण कॉइल पेटवून ठेवतात. यामुळे डास येण्याचे प्रमाण कमी होते. पण, याच कॉइलने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील शास्त्री पार्क येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
डासांच्या कॉइल आणि गादीला आग लागल्याने पसरलेल्या धुरात कुटुंबातील ६ जण गुदमरले, तर ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात रात्रीच्या वेळी खोलीतील डास दूर करण्यासाठी मार्टिन जाळून झोपलेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या जग प्रवेशचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या मजल्यावरील एक खोली आहे यामध्ये एकूण ९ लोक झोपले होते. मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यावेळी, १५ वर्षीय मुलीसह २ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला. यात मच्छी मार्केट, मजार वाला रोड, शास्त्री पार्कजवळील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सर्व ९ लोकांना रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला.
नेमकं घडलं काय?
रात्री गादीच्या बाजूला जळणारी डासांची कॉईल पडल्याची माहिती मिळाली. विषारी धुरामुळे खोलीत झोपलेले लोक बेहोश झाले आणि नंतर गुदमरून ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.