Delhi Violence : ५३१ गुन्हे दाखल अन् १६४७ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 09:24 PM2020-03-04T21:24:57+5:302020-03-04T21:30:22+5:30
Delhi Violence : ४७ गुन्हे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - CAA वरून पेटलेल्या दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ५३१ गुन्हे नोंद केले आहेत. त्यापैकी ४७ गुन्हे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. तर १६४७ जणांना पोलिसांनी ताब्यात आणि काहींना अटक केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरु केली. याआधी CAA वरून दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १२३ गुन्हे नोंद केले. तर ६३० जणांना पोलिसांनी ताब्यात आणि काहींना अटक केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एमएस रांधवा यांनी दिली होती.
देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला होता. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या जवानाच्या घरांवर निशाणा साधला होता. २५ फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली होती. CAA कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi violence: द्वेष आणि हिंसाचारामुळे भारताचे नुकसान - राहुल गांधी
Delhi Police: 531 cases have been registered so far, including 47 cases under the Arms Act. 1,647 people have also been either arrested or detained. #DelhiViolencepic.twitter.com/2BWP8hkvkp
— ANI (@ANI) March 4, 2020