Delhi Violence : अंकित शर्मा हत्येप्रकरणी आणखी पाचजणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 09:45 PM2020-03-14T21:45:28+5:302020-03-14T21:50:12+5:30

Delhi Violence : आरोपीने जवळपास अर्धा तास अंकित शर्माला मारहाण केली व त्याच्यावर चाकू - लाठीने  वार केले. नंतर त्याचा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला.

Delhi Violence: Five more arrested for Ankit Sharma murder case pda | Delhi Violence : अंकित शर्मा हत्येप्रकरणी आणखी पाचजणांना अटक 

Delhi Violence : अंकित शर्मा हत्येप्रकरणी आणखी पाचजणांना अटक 

Next
ठळक मुद्देयाव्यतिरिक्त कोर्टाने आज सुमित, अंकित आणि प्रिन्स यांना दिल्लीतील हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले.ताहिरचा भाऊ शाह आलम आणि आबिद, रशीद आणि शादाब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात गुप्तचर विभागाचा (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी शनिवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोर्टाने आज सुमित, अंकित आणि प्रिन्स यांना दिल्लीतील हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले.


याआधीही या प्रकरणात माजी नगरसेवक ताहिर हुसैन आणि सलमानसह त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी कड़कड़डूमा कोर्टाने हसीन उर्फ सलमानला चार दिवसांच्या गुन्हे शाखेच्या कोठडीत सुपूर्द केले. कोर्टाने ताहिरला तीन दिवसांचा रिमांड सुनावण्यात आला आहे, तर ताहिरचा भाऊ शाह आलम आणि आबिद, रशीद आणि शादाब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Delhi Violence :...म्हणून झाला अंकित शर्मांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड

Delhi Violence : मारत मारत नेले ताहिरच्या घरी अन् केले ४०० वेळा सपासप वार 


विशेष म्हणजे पोलिसांनी 26 फेब्रुवारी रोजी चांद बाग परिसरातील नाल्यातून अंकित शर्माचा मृतदेह ताब्यात घेतला होता. ताहिर हुसैन यांनी मुलाचा खून केल्याचा आरोप अंकितचे वडील रवींद्र कुमार यांनी केला होता. चौकशीत सलमानने अंकित शर्माच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की आयबी अधिकारी  अंकित शर्माला ठार मारण्यापूर्वी त्याचे सर्व कपडे काढून टाकण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. आरोपीने जवळपास अर्धा तास अंकित शर्माला मारहाण केली व त्याच्यावर चाकू - लाठीने  वार केले. नंतर त्याचा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला.

Web Title: Delhi Violence: Five more arrested for Ankit Sharma murder case pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.