Delhi Violence :...म्हणून झाला अंकित शर्मांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:50 PM2020-03-14T14:50:36+5:302020-03-14T14:52:40+5:30
Delhi Violence : अंकित शर्मावर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.
नवी दिल्ली - इंटेलिजेंस ब्यूरोचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यात अंकित शर्माच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज झाला असल्याचे सांगितले गेले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, फुफ्फुसे आणि मेंदूच्या दुखापतीमुळे अंकित शर्माचा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. अंकित शर्मावर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. मृत अधिकाऱ्याच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या.
सलमानने अंकितवर तीन वार केले
त्याचवेळी गुन्हे शाखेला तपासात आरोपी हसीन उर्फ सलमान उर्फ मुल्ला उर्फ नन्हे याने आयबी अधिकारी अंकित शर्माला चाकूने चाकूने वार केले होते, हे उघड झाले आहे. यापूर्वी निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनच्या घरी उपस्थित जमावाने अंकितला बेदम मारहाण केली होती. तथापि, ताहिरने अंकितवर हल्ला केला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मूसा नावाच्या एका व्यक्तीचा मोबाइल फोन इंटरसेप्ट करत असताना सलमानबद्दल स्पेशल सेलने माहिती मिळविली होती. वास्तविक हिंसाचाराच्यावेळी स्पेशल सेलने चांद बागचा रहिवाशी असलेल्या मूसाचा मोबाइल फोन ट्रेसवर ठेवला होता. त्याचे संभाषण ऐकले जात होते, त्यात सलमानचे नाव समोर आले होते. सलमानचा फोनही ट्रेसवर ठेवण्यात आला होता. यात तो फोनवर एकाला सांगत होता की त्याने एकाला भोसकले आहे. या संभाषणाच्या आधारे स्पेशल सेलने पथकाने गुरुवारी चांद बाग भागातून सलमानला पकडले. तो मूळचा अलिगडचा आहे. यमुनापारमध्ये तो नंदनगरीच्या सुंदरनगरी येथे राहत होता.
चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, हिंसाचारादरम्यान पोलिसांनी एक गोळी झाडून मुस्लिम कुटुंबातील चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविली. यामुळे चांद बाग मधील विशिष्ट लोकांचा रोष पेटला आणि त्याने हिंसाचारास सुरूवात केली. दरम्यान, करावल नगर रोडवरील चांद बाग पुलाजवळ दगडफेक झाली. दरम्यान, त्याने ताहिरच्या घराबाहेर शेकडो लोक एकत्र जमले आणि दगडफेक करताना पाहिले. त्याचवेळी काही तरुण एका व्यक्तीला मारहाण करत खेचत नेत होते. तो अंकित होता, ज्याचे कपडे फाटले होते. यानंतर त्यालाही चाकूने अंकितवर वार केले.
आपचे नेते आयबी अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना भेटले
आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांकडून शुक्रवारी आप नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यात आपचे ज्येष्ठ नेते दुर्गेश पाठक, नगरसेवक मनोज त्यागी व अन्य नेते उपस्थित होते. नेत्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. दुर्गेश पाठक यांनी कुटुंबियांना आश्वासन दिले की सरकार कुटुंबास सर्वतोपरी मदत करेल.