Delhi Violence : ताहिर हुसैन आता ईडीच्या रडारवर, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:40 PM2020-03-11T13:40:25+5:302020-03-11T13:43:16+5:30

Delhi Violence : ताहिरच्या लोकप्रिय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरपंथी संघटनेशी संबंधित संबंधांचीही चौकशी केली जात आहे.

Delhi Violence: Tahir Hussain is now on ED's radar, case registered pda | Delhi Violence : ताहिर हुसैन आता ईडीच्या रडारवर, गुन्हा दाखल

Delhi Violence : ताहिर हुसैन आता ईडीच्या रडारवर, गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पक्षाच्या निलंबित नगरसेवकाविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी दिल्ली पोलिसांनीही ताहिरचा भाऊ शाह आलम याला ताब्यात घेतले होते.

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारादरम्यान आयबीचा अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप ताहिर हुसैनविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (११ मार्च) गुन्हा दाखल केला. अंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पक्षाच्या निलंबित नगरसेवकाविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबोरबरच ताहिरच्या लोकप्रिय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरपंथी संघटनेशी संबंधित संबंधांचीही चौकशी केली जात आहे. यापूर्वी सोमवारी दिल्ली पोलिसांनीही ताहिरचा भाऊ शाह आलम याला ताब्यात घेतले होते. अंकित शर्माच्या हत्येच्या चौकशीत शाह आलमचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. रविवारी ताहिर हुसैनला मदत करणारे वडील-मुलगा रियासत अली आणि लियाकत यांनाही कड़कड़डूमा कोर्टात हजर करण्यात आले. रियासत अलीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे आणि त्याचे वडील लियाकत याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हिंसाचारास प्रवृत्त केल्याचा आरोपी तारिक रिझवी याला जामीन मंजूर झाला. आरोपी वडील व मुलावर हिंसाचाराच्या वेळी जमावाचे नेतृत्व केले, त्या ठिकाणी दगडफेक व पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी चांद बाग परिसरातील नाल्यातून अंकित शर्माचा मृतदेह ताब्यात घेतला होता. ताहिर हुसैनने मुलाचा खून केल्याचा आरोप अंकितचे वडील रवींद्र कुमार यांनी केला होता. बरेच दिवस शोध घेऊनही ताहिर पोलिसांसमोर आला नव्हता. नंतर त्याने कोर्टात शरणागती पत्करली. ताहिर हुसैनने पोलिसांना सांगितले होते की, हिंसाचारानंतर तो मुस्तफाबादच्या नेहरू विहार भागात गेला. त्यानंतर दोन दिवस तो झाकीर नगर परिसरातील तारिकच्या घरात लपला होता.

Web Title: Delhi Violence: Tahir Hussain is now on ED's radar, case registered pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.