Delhi Violence : वाहत्या नाल्यात सापडले आणखी तीन मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:57 PM2020-03-01T17:57:11+5:302020-03-01T18:02:24+5:30

Delhi Violence : आता या हिंसाचारात मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे.

Delhi Violence: Three more bodies found again in flowing drain pda | Delhi Violence : वाहत्या नाल्यात सापडले आणखी तीन मृतदेह

Delhi Violence : वाहत्या नाल्यात सापडले आणखी तीन मृतदेह

Next
ठळक मुद्दे हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 45 वर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.सध्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलीस प्रशासन मृतदेहांची ओळख पटवित आहे.

नवी दिल्लीदिल्लीतील हिंसाचार थांबलेला दिसत आहे, परंतु अद्याप परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली नाही. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात अद्यापही सापडत असलेल्या मृतदेहामुळे लोक संतापले आहेत. रविवारी गोकुळपुरी भागात नाल्यातून १ आणि भागीरथी बिहारमधून दोन असे आणखी तीन मृतदेह सापडले. अशा प्रकारे आता या हिंसाचारात मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे. दिल्लीतील हिंसाचारानंतर मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आज सकाळी ११ वाजता पहिला एक मृतदेह सापडला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत एकूण तीन मृतदेह आढळून आले. गोकुळपुरी नाल्यातून एक आणि भागीरथी नाल्यातून दोन मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. दुर्गंधी आल्यानंतर लोकांनी पोलिसांना कळविले, त्यानंतर शोध मोहीम राबवून पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 45 वर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.

Delhi Violence : दंगलखोरांनी जवानाचे घर जाळले, बीएसएफमधील सहकारी मदतीस धावले


Delhi Violence:…तर आमचंही लिंचिंग झालं असतं! ACP नीं सांगितला तो भयानक प्रसंग


सध्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलीस प्रशासन मृतदेहांची ओळख पटवित आहे. यापूर्वी विविध भागातील या नाल्यातून तीन मृतदेह सापडले आहेत. या नाल्यातून चांद बाग परिसरातून आयबी कॉन्स्टेबल अंकितचा मृतदेहही मिळाला. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, चांदबाग, शिव विहार, भजनपुरा, यमुना विहारमध्ये हिंसाचारामुळे 42 जणांचा मृत्यू आणि 200 हून अधिक जखमी झाले. मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरोडेखोरांच्या जमावाने घरे, दुकाने, वाहने आणि पेट्रोल पंप पेटवून स्थानिक आणि पोलिसांवर दगडफेक केली.

हिंसाचारात वापरलेला रासायनिक कारखाना

दुसरीकडे, करावल नगर परिसरातील गोविंद विहार भागात सुमारे २० वर्षांपासून एक केमिकल फॅक्टरी सुरु आहे. कारखान्याजवळच एक खासगी शाळा देखील आहे. कारखाना बंद करण्यासाठी शाळेच्या वतीने अनेक तक्रारी करण्यात आल्या पण त्याबाबत ठोस कारवाई कधीच करण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचाराच्या वेळी ही रासायनिक पुरवठा होती. जवळपासच्या दुकानदारांचे म्हणणे आहे की हिंसाचारापूर्वी काही लोक या कारखान्याला भेट देतच असतात. याशिवाय या भागात इतर कोणतेही रासायनिक कारखाने नाहीत.



हिंसाचाराच्या आगीत शिव विहार नष्ट झाला

हिंसाचाराच्या आगीत शिव विहार पूर्णपणे नष्ट झाला आहे. परिसरातील घरांपासून ते दुकानेपर्यंत विनाशाचे ते भयानक दृश्य पाहिले गेले, या दृश्यांमुळे कोणाच्याही अंगावर शहरे येतील. शिव विहार मार्केटच्या आसपास अनेक घरे लॉक होती. लोक अजूनही भीतीच्या छायेत या भागात राहत आहेत. हिंसाचार शांत झाल्यानंतर दैनिक जागरणच्या पथकाने शनिवारी शिव विहार परिसराला भेट दिली. दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब टाकले त्या प्रत्येक घरी जाऊन पथकाने पाहणी केली. आजपर्यंत या कॉलनीत कधीच किरकोळ भांडणही झाले नव्हते. तिथे आज इतकी मोठी दंगल झाली की संपूर्ण परिसर आता ओसाड पडला आहे.
 

Web Title: Delhi Violence: Three more bodies found again in flowing drain pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.