Delhi Voilence : पहिले आरोपपत्र दाखल, शाहरुखसह अनेकांना बनवले आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 10:28 PM2020-05-01T22:28:48+5:302020-05-01T22:31:44+5:30
Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारादरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखसह इतर लोकांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहेत.
Next
ठळक मुद्देशाहरुखने हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्या छातीवर पिस्तुल उगारली होती आणि दिल्ली दंगलीच्या वेळी लोकांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यूपीच्या कैराना येथे फरार असलेल्या शाहरुखला आश्रय देण्याच्या आरोपाखाली आरोपींनी कालीमलाही चौकशीअंती अटक केली.
दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. यात दिल्ली हिंसाचारादरम्यान पोलिसांवरगोळीबार करणाऱ्या शाहरुखसह इतर लोकांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहेत. दिल्ली हिंसाचारादरम्यान शाहरुखने हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्या छातीवर पिस्तुल उगारली होती आणि दिल्ली दंगलीच्या वेळी लोकांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Delhi Voilence : पहिले आरोपपत्र दाखल, शाहरुखसह अनेकांना बनवले आरोपी https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) May 1, 2020
पोलिसांनी आरोपी शाहरुखला ३ मार्च रोजी अटक केली. यूपीच्या कैराना येथे फरार असलेल्या शाहरुखला आश्रय देण्याच्या आरोपाखाली आरोपींनी कालीमलाही चौकशीअंती अटक केली. आरोपी शाहरुख याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल व इतर शस्त्रेही जप्त केली आहेत.
दिल्ली पोलिसांनी कड़कड़डूमा कोर्टात 350 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. शाहरुखशिवाय कालीम, इश्तियाक मलिक आणि इतर आरोपींची नावे यात समाविष्ट आहेत. यापूर्वी हिंसाचाराचे षडयंत्रात सहभाग असल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जामिया अल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष सिफा उर-रहमान यांना अटक केली.
यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने जामिया समन्वय समितीचे मीडिया प्रभारी सफुरा जर्गर यांना अटक केली. सफुरा देखील 3 महिन्यांची गर्भवती आहे. दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी दंगल उसळली. दंगलखोरांनी भीषण हिंसाचार निर्माण केला होत. या हिंसाचारात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला.
Delhi Voilence : पहिले आरोपपत्र दाखल, शाहरुखसह अनेकांना बनवले आरोपी https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) May 1, 2020
Delhi Voilence : दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दंगेखोरांची पोलिसांनी केली धरपकड सुरु
Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह