Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 14:48 IST2020-02-26T14:43:40+5:302020-02-26T14:48:00+5:30
Delhi voilence : या दंगेखोरांनी त्याला मारहाण केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकला, असा आरोप केला जात आहे.

Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह
नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असून या आगडोंबात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील चंदबाग पुलाजवळ वाहणार्या नाल्यातून गुप्तचर विभागाच्या (आयबी) पोलीस हवालदाराचा मृतदेह आज दुपारी वाढल्याने खळबळ उडाली. मृत कॉन्स्टेबल अंकित शर्मा खजुरी येथे राहत होते. मंगळवारी संध्याकाळी ते ड्युटीवरून घरी परतत असताना काही लोकांनी चांद बाग पुलाला घेराव घातला. या दंगेखोरांनी त्याला मारहाण केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकला, असा आरोप केला जात आहे.
Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू
Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण
अंकित घरी न पोहोचल्याने कुटुंब अस्वस्थ झाले. मंगळवारपासून अंकितचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते. अंकितचे वडील रवींदर शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. मारहाणीबरोबरच अंकितलाही गोळ्या घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मृत पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात (CAA) मंगळवारी उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आगडोंब उसळला आहे. सोमवारी अनेक घरे, दुकाने आणि अनेक वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक व गोळ्या झाडण्यात आल्या. या हिंसक निदर्शनांमध्ये गोकुळपुरी भागात हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला, तर शाहदराचे डीसीपी अमित शर्मा जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल रत्न लाल हे सहाय्यक उपायुक्त कार्यालयात कार्यरत होते. दरम्यान, डीसीपी शर्मा यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी डीसीपी यांची प्रकृती सुधारली. त्याचवेळी मृत पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन लाल (42) हे एकटेच कुटुंबात पैसे कमावत होते. ते पत्नी आणि तीन मुलांसमवेत बुरारी येथे राहत होते.