Delhi Voilence : संवेदनशील परिसराची केजरीवाल, सिसोदिया यांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 08:58 PM2020-02-26T20:58:14+5:302020-02-26T21:01:16+5:30
Delhi Voilence : शांतता बाळगण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दक्षिण पूर्व दिल्लीतील संवेदनशील परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच शांतता बाळगण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
Delhi Violence : निवडणुकीत ठाण मांडून बसलेले शाह हिंसेच्यावेळी कुठय: ओवेसी
Delhi Violence: दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही- हायकोर्ट
दिल्ली हिंसाचार : सैन्याला बोलवून प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्याची केजरीवालांची मागणी
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी चार मृतदेह सापडलेत. यात एका आयबी या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या २४ तासांमध्ये तीन बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही दंगलग्रस्त भागांची पाहणी केली आहे. ते पंतप्रधान मोदी यांना आपला अहवाल सादर करणार आहेत.
त्याचप्रमाणे, दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Delhi CM Arvind Kejriwal and Deputy CM Manish Sisodia are visiting sensitive areas in #NortheastDelhi and interacting with the local residents there, to take stock of the situation of the area. pic.twitter.com/khsoWN9pLh
— ANI (@ANI) February 26, 2020