धक्कादायक! 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीने पतीचा कान चावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:30 PM2023-11-27T12:30:35+5:302023-11-27T12:38:09+5:30

महिलेने आपल्या पतीच्या कानाचा इतक्या जोरात चावा घेतला की कानाचा तुकडाच खाली पडला.

delhi woman bites off husbands ear in sultanpuri fir registered | धक्कादायक! 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीने पतीचा कान चावला अन्...

धक्कादायक! 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीने पतीचा कान चावला अन्...

दिल्लीतील सुलतानपुरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने रागाच्या भरात पतीचा कान चावला. महिलेने आपल्या पतीच्या कानाचा इतक्या जोरात चावा घेतला की कानाचा तुकडाच खाली पडला. यानंतर महिलेच्या पतीवर सर्जरी करावी लागली. उपचारानंतर त्याने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांनी महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पतीने पोलिसांना सांगितलं की, तो 20 नोव्हेंबरला सकाळी घराबाहेर कचरा टाकण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने पत्नीला घर साफ करण्यास सांगितलं. मात्र घरी परतताच पत्नीने भांडण सुरू केलं.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, व्यक्तीने सांगितलं की, पत्नीने त्याला त्याचं घर विकून तिला तिचा हिस्सा देण्यास सांगितलं जेणेकरून ती आपल्या मुलांसोबत वेगळी राहू शकेल. त्याने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नी सतत वाद घालत राहिली.

पत्नीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला दूर ढकलले. यानंतर तो घराबाहेर पडू लागला असता त्याच्या पत्नीने त्याला मागून पकडून त्याच्या कानाचा चावा घेतला. यानंतर मुलगा त्याला मंगोलपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून या घटनेची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर एक टीम गेली. व्यक्तीने आपला जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार असल्याचं पोलिसांना सांगितलं. यानंतर 22 नोव्हेंबर रोजी त्याने पोलिसांशी संपर्क साधून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: delhi woman bites off husbands ear in sultanpuri fir registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.