Video : मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:53 PM2021-08-16T14:53:27+5:302021-08-16T14:53:33+5:30
Gajanan Kale Case : गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे.
नवी मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर महाविकास आघाडीच्या महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र चार दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र पोलिसांकडून आयुक्तालयाबाहेर जमावाला अडवले आहे.
नवी मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर महाविकास आघाडीच्या महिला जमा, काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित pic.twitter.com/7TkEexDoaX
— Lokmat (@MiLOKMAT) August 16, 2021
मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
पती गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल करूनही काळेंना अटक न झाल्याने संतप्त महिला पोलीस आयुक्तालयासमोर धडकल्या आहेत.