माजी उपनगराध्यक्षाचे फेसबुक अकाउंट हॅक करून पैशांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 09:22 PM2020-12-11T21:22:01+5:302020-12-11T21:22:29+5:30

Cyber Crime : त्यात एका कडून ३० हजार रुपये पेटीएमने मागण्यात आले व त्यासाठी मोबाईल क्रमांक सुद्धा दिला. 

Demand for money by hacking the former vice president's Facebook account | माजी उपनगराध्यक्षाचे फेसबुक अकाउंट हॅक करून पैशांची मागणी  

माजी उपनगराध्यक्षाचे फेसबुक अकाउंट हॅक करून पैशांची मागणी  

Next
ठळक मुद्दे आपल्या नावाने कोणी मागितल्यास ते देऊ नये आणि थेट पोलिसात तक्रार करावी असे आवाहन कदम यांनी केले आहे.  

मीरारोड - माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम ह्यांचे फेसबुक खाते हॅक करून त्या द्वारे लोकं कडे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कदम यांना अभिजित दास यांनी कळवले कि , तुमच्या नावाने फेसबुक वरून पैसे मागितले जात आहेत .  कदम यांनी माहिती घेतली असता त्यांचे एक वापरात नसलेले फेसबुक खाते कोणी तरी हॅक केल्याचे लक्षात आले . त्यात एका कडून ३० हजार रुपये पेटीएमने मागण्यात आले व त्यासाठी मोबाईल क्रमांक सुद्धा दिला. 

अनेकांना कदम यांच्या एफबी खात्यातून पैसे मागण्याचे मॅसेज देण्यात आल्याचे उघडकीस आले . या प्रकरणी त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून पैसे जमा करण्यासाठी दिलेला पेटीएमचा मोबाईल नगर सुद्धा दिला आहे . आपल्याला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कोणी हा प्रकार केला आहे . सदर हॅकर आणि मोबाईल क्रमांक यांचा तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपल्या नावाने कोणी मागितल्यास ते देऊ नये आणि थेट पोलिसात तक्रार करावी असे आवाहन कदम यांनी केले आहे.  

Web Title: Demand for money by hacking the former vice president's Facebook account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.