Cyber Crime : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 12:06 PM2021-06-05T12:06:34+5:302021-06-05T12:07:58+5:30

Collector Jitendra Papalkar : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून अकोल्यातील अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

Demand for money by opening fake Facebook account of Akola District Collector | Cyber Crime : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

Cyber Crime : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

Next
ठळक मुद्देअनेकांना पैशांची मागणी केली जात आहे. तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.

अकोला : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, याचा फटका चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून अकोल्यातील अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती पोलिसांना देण्यात आली असून अकाउंट बंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.

अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले असून, या अकाउंटवरून मॅसेंजरद्वारे अनेकांना पैशांची मागणी केली जात आहे. हॅकरने माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे पुत्र अखिलेश हातवळणे यांना शुक्रवारी रात्री पापळकर यांच्या बनावट अकाऊंटवरून मॅसेज केला. तातडीने १२ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगून ऑनलाइन पैसे खात्यात वळते करण्याची विनंती केली. काही तरी गौडबंगाल असल्याचे लक्षात येताच अखिलेश हातवळणे यांनी याबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांना माहिती दिली. याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली असून, पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Demand for money by opening fake Facebook account of Akola District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.