महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 09:33 PM2021-03-03T21:33:05+5:302021-03-03T21:33:54+5:30

Fake facebook Account of Revenu minister's Daughter : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार; बनावट फेसबुक खाते

Demand for money by opening fake Facebook account in the name of revenue minister's daughter | महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशाची मागणी

महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशाची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. १ ते २ मार्चच्या कालावधीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बनावट खात्याद्वारे त्याने काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली.

संगमनेर (जि. अहमदनगर) : काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकचे बनावट खाते उघडून गुगल पे, फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोेर आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे बनावट खाते बंद करून खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. १ ते २ मार्चच्या कालावधीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बनावट खात्याद्वारे त्याने काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली. फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. हे खाते त्वरित बंद करुन तपास करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. गुगल पे व फोन पे द्वारे पैसे मागितल्याचे स्क्रिन शाॅट त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत.

 

Web Title: Demand for money by opening fake Facebook account in the name of revenue minister's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.